Jio Financial Services Shares: आज दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जियो फाइनेंशियल सर्विसेज (Jio Financial Services Ltd) च्या शेअर्सची खरेदीसाठी गुंतवणूकदारांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येत आहे. सकाळपासून जियोच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आणि सध्या ते 295.70 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहेत. सकाळी 256.35 रुपयांवर उघडलेला हा शेअर दिवसभरात आणखीन वाढतच गेला.
आज अंबानींनीची कंपनी करतेय जोरदार कमाई: (Jio Financial Services Shares)
अचानक कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होणायचं कारण आहे Paytm, हो!! तुम्ही अगदी बरोबरच वाचलं आहे. जियो फाइनेंशियलकडून Paytmला आर्थिक मदत देण्याच्या बातम्यांमुळे जियो फाइनेंशियलच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर आणला आणि त्यामुळे शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली. सध्या शेअर 290 रुपयांच्या पातळीवर कार्यरत आहे आणि या तेजीमुळे जियो फाइनेंशियलचे बाजार मूल्य 1.87 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.
अंबानींच्या या यशाला Paytm जबाबदार का?
जियो फाइनेंशियलच्या शेअर्समध्ये आली ही तेजी अचानक घडलेली नाही, यामागे एक प्रमुख कारण आहे आणि वर नमूद केल्याप्रमाणे ते कारण आहे Paytm. पेटीएमच्या वॉलेट (Paytm Wallet) व्यवसायाला जियो फाइनेंशियल खरेदी करणार असल्याची बातमी समोर आल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक तेजी आली (Jio Financial Services Shares). या बातमीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि त्यांनी जियो फाइनेंशियलच्या शेअरमध्ये खरेदी करायला सुरुवात केली .ही बातमी समोर आल्यानंतर जियोच्या शेअर्सची जोरदार खरेदी सुरू आहे. मात्र, याबाबत जियो फाइनेंशियलकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.