Jio Financial Services : मुकेश अंबानी रिलायन्स तसेच जिओच्या माध्यमातून भरपूर नाव कमावत आहेत.रिलायन्सच्या अंतर्गत येणाऱ्या जिओ फायनान्शिअल सर्विसीसनी आता आपल्या सुविधांमध्ये वाढ करवत पर्सनल लोनच्या व्यवसायात प्रवेश केला आहे. जियोने या संदर्भातील माहिती मंगळवारी सर्वांसाठी खुली केली होती. आता कशी असेल हि जिओची नवीन सुविधा, आपण त्याचा कसा फायदा करवून घेऊ शकतो याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
Jio ने सुरु केली पर्सनल लोनची सुविधा: Jio Financial Services
भारतातील नावाजलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृवाखाली जिओ फायनान्शिअल कंपनीने पर्सनल लोन द्यायला सुरुवात केली आहे. माय जिओ (My Jio) एपचा वापर करून तुम्ही या पर्सनल लोनच्या सुविधेचा ऑनलाईन वापर सुरु करू शकता. माय जिओ हा एप वापरून तुम्ही एकमेकांना पैसे पाठवू शकता तसेच लाईट बिल भरणे, मोबाईलचा रिचार्ज करणे यांसारख्या आवश्यक आर्थिक गोष्टी घर बसल्या पूर्ण करू शकता. या एपचे एकूण 25.02 कोटी मंथली यूजर्स आहेत. तसेच कंपनीकडून 300 ऑफलाईन स्टोर्समध्ये कन्ज्युमर ड्युरेबल लोनचा लवकरच विस्तार करण्याची घोषणा केली आहे.
जिओ फायनान्शिअल कंपनीच्या येणार या योजना:
सध्या जिओ फायनान्स (Jio Financial Services) हि कंपनी सेल्फ इम्प्लोयड लोकांना कर्ज देण्यावर काम करत आहे . तसेच देशात चालेल्या लघु उद्योगांना आणि सोल प्रोपाय्टर यांना आर्थिक मदत करण्यासाठी कर्ज देऊ करण्यावर त्यांचे काम सुरु आहे. याचबरोबर हि कंपनी ऑटो आणि होम लोनसह शेअर्स तारण म्हणून ठेऊन निधी उपलब्ध करवून देण्यावरही लक्ष केंद्रित करून आहे. जिओ फायनान्शिअल कडून अनेक क्षेत्रातील कंपन्यांबरोबर करार केला जात आहे ज्यात प्रमुख म्हणजे जीवन, विमा आणि सामान्य कंपन्यांचा समावेश होतो. आणि लक्ष्यात घेण्याची बाब म्हणजे हि कंपनी विमा ब्रोकिंग मध्ये इतर कंपन्यांना मोठी टक्कर देणार आहे.