Jio Financial Share: आजच्या शेअर बाजारात आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नवीन कंपनीने शेअर बाजारात धमाकेदार पदार्पण केले. रिलायन्स समूहातून वेगळे झाल्यानंतर या कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. शुक्रवारी 23 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.
Jio Financial Share चा शेअर 14 टक्क्यांनी वाढला:
शुक्रवारी रिलायन्स समूहाच्या Jio Financial Limited च्या शेअरने दमदार कामगिरी करत सलग पाचव्या दिवशी वाढ नोंदवली. व्यापारी सत्रात हा शेअर 14 टक्क्यांपर्यंत उंचावला आणि 347 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. जानेवारी 2024 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत या शेअरमध्ये 44 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. आज म्हणजेच शुक्रवारी 23 फेब्रुवारी 2024 Jio Financial च्या शेअरमध्ये कमालीची वाढ झाली. सकाळच्या व्यापारात शेअर 8 टक्क्यांची वाढीसह 326 रुपयांवर उघडला. दिवसभरात शेअर 347 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आणि या वाढीमुळे कंपनीचे बाजारातील भांडवल 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे.
गेल्या पाच दिवसांत, कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 23.67 टक्क्यांची वाढ झाली, याचा अर्थ असा की जर तुम्ही पाच दिवसांपूर्वी 100 रुपये गुंतवले असतील तर आज तुमची गुंतवणूक 123.67 रुपये झाली असती(Jio Financial Share). त्याचप्रमाणे, एका महिन्यात या शेअरची किंमत 41.20 टक्के इतकी वाढली, याचा अर्थ असा की जर तुम्ही एका महिन्यापूर्वी 100 रुपये गुंतवले असते तर आज तुमची गुंतवणूक 141.20 रुपये झाली असती.