Jio Free Data Plans: Jio च्या यूजर्ससाठी खुशखबर!! कंपनी देतेय Free इंटरनेट डेटा

Jio Free Data Plans: तुम्ही जिओचे वापरकर्ते आहात का? हो!! तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे, कारण दरवेळी प्रमाणे आज देखील जिओ ही कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी काही खास ऑफर घेऊन आली आहे. Jio ही भारतात सर्वाधिक ग्राहक वर्ग असलेले टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखली जाते आणि सध्या त्यांनी 5G सेवांचा अवलंब केल्यामुळे हि कंपनी अधिकाधिक ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहे. आताच्या घडीला काही लोकं वर्क फ्रॉम होम (Work From Home) द्वारे नोकरी करतात, त्यामुळे त्यांना अधिकाधिक मोबाईल डेटाची गरज असते. लक्ष्यात घ्या कि, तीच कंपनी ग्राहकांच्या पसंतीस उतरते जी त्यांच्या गरजा ओळखू शकेल आणि जिओ याच कंपन्यांपैकी एक आहे. सध्या जियो आपल्या वापरकर्त्यांना काही प्रीपेड प्लॅन्स (Prepaid Plans) द्वारे बोनस डेटा देऊ करत आहेत. तुम्ही जिओचा वापरकर्ते असाल आणि नवीन रिचार्ज करण्याच्या विचारात असाल तर या दोन जबरदस्त प्लॅन्स बद्दल नक्कीच संपूर्ण माहिती मिळवा, कारण केवळ तीनशे रुपयांमध्ये मिळणारे हे प्लॅन्स तुमच्यासाठी भरपूर फायदेशीर ठरू शकतात.

जिओचा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: (Jio Free Data Plans)

Jio चा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा 28 दिवसांसाठी वैध असतो. ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज शंभर SMS आणि 3GB डेटा दिला जातो. मात्र यात जिओ कडून वापरकर्त्यांना 61 रुपयांचा मोफत डेटा देण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहक 6GB बोनस डेटाचा वापर करू शकतात. या प्लॅनची संपूर्ण वैधता लक्षात घेतली तर ग्राहकांना याअंतर्गत 90 GB डेटा मिळतो. हा प्लॅन मिळवण्यासाठी तुम्हाला माय जिओ ॲपच्या(My Jio App) डेटा बूस्टर सेक्शन मध्ये जाऊन 61 रुपयांच्या प्लॅनची निवड करावी लागेल. शिवाय बाकी जिओ मोबाईल रिचार्ज प्लॅन्स प्रमाणे इथे देखील तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जीव क्लाउड यांचा अतिरिक्त वापर करण्याची संधी मिळणार आहे. या प्लॅनचा वापर 5G मोबाईल धारक देखील करू शकतात.

जिओचा 219 रुपयांचा प्रीपेड प्लॅन:

जिओचा 219 रुपयांचा प्रीपेड प्लॅनची वैधता ही 14 दिवसांसाठी आहे. ज्यामध्ये तुम्ही बाकी प्लॅन्स प्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 3GB डेटा आणि शंभर SMSचा वापर करू शकता. मात्र कंपनी या प्लॅनच्या अंतर्गत तुम्हाला 25 रुपयांचा मोफत डेटा देईल. अर्थ असा की प्लॅन अंतर्गत ग्राहकांना 2GB मोफत डेटा (Jio Free Data Plans) दिला जातो आणि त्यांचे संपूर्ण व्हॅलिडीटी तपासून पाहिली तर ग्राहक एकूण 44 मोबाईल डेटाचा वापर करू शकतात. जिओच्या बाकी रिचार्ज प्लॅन प्रमाणे हा प्लॅन देखील तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड या सवलती मिळवून देईल. सध्यातरी देशातील 5G वापरकर्त्यांना काही प्रीपेड प्लॅन सोबत मोफत डेटा दिला जातोय. मात्र यासाठी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात 5G कव्हरेज असणं महत्त्वाचं आहे आणि त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं म्हणजे तुमच्या मोबाईल जवळ 5G ची क्षमता असणे सर्वात गरजेचे आहे.