Jio Free Recharge : Jio देतेय वर्षभर फ्री रिचार्ज; ग्राहकांनो, असा घ्या लाभ

Jio Free Recharge : Jio ही देशभरात वापरली जाणारी आणि सर्वाधिक चर्चेत असणारी अशी टेलिकॉम कंपनी आहे. Jio ने बाजारात प्रवेश करता क्षणीच आपल्या ग्राहकांना मोफत डेटा व अनलिमिटेड कॉलिंगच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. आत्ताच्या घडीला जरी जिओ ही सवलत देत नसली तरीही वेगवेगळ्या रिचार्ज प्लॅन्समधून कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांचे हित जपत आली आहे. सिम कार्ड वापरकर्त्यांच्या गरजा ओळखून ही टेलिकॉम कंपनी आपले मोबाईल रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करवत असते. आता लवकरच २०२४ हे वर्ष सुरु होणार असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी अशीच एक भन्नाट योजना अंमलात आणली आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला अगदी मोफत मध्ये रिचार्ज मिळतोय.

अशी आहे नवीन वर्षाची रिचार्ज योजना (Jio Free Recharge) :

रिलायन्स जिओ ही आपल्या देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर्स पैकी एक आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीचा भाग असलेली ही टेलिकॉम कंपनी वर्ष 2016 मध्ये भारतीय बाजारात व्यवहार करण्यासाठी उतरली. वेळोवेळी कंपनीकडून देण्यात आलेल्या सोयीसुविधा दूरसंचार उद्योगात खळबळ उडवतात आणि आता पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिओने आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी फ्री रिचार्ज (Free Recharge) आणि युजर फ्री डेटाची (User Free Data) नवीन योजना आखली आहे.

कसा मिळवायचा फ्री रिचार्ज –

जिओच्या या भन्नाट योजनेचा फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला माय जिओ एप (My Jio App) मध्ये प्रवेश करावा लागेल. तिथे तुम्हाला Pay And Win हा पर्याय दिसेल. त्यावर क्लीक करताच तुम्ही वन इयर रिचार्ज ऑफर(One Year Recharge Offer ) किंवा डेटा ऑफर(Data Offer) या पर्यायांची निवड करून तुम्ही योजनेचा लाभ मिळवू शकता. सध्या कंपनी 365 दिवसांच्या वैधतेसह जिओ प्रीपेड प्लॅन्समध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल, एसएमएस आणि डेटा यांसारख्या सुविधा प्रदान करते ज्यामुळे तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची आवश्यकता भासत नाही.

असे आहेत जिओचे भन्नाट प्लॅन्स:

1559 रुपयांत मिळणारा जिओचा नवीन रिचार्ज प्लॅन हा एका वर्षेसाठी वैध ठरतो. यामध्ये तुम्ही अमर्यादित वोईस कॉल्स आणि 24GB डेटाचा वापर करू शकता. एवढेच नाही तर याशिवाय सदर रिचार्ज प्लॅनमध्ये 36 हजार एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. खास करून कंपनी या रिचार्ज प्लॅनच्या वापरकर्त्यांना जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊड्स अश्या जिओ एप्सचे सबस्क्रिप्शन मोफत प्रदान करते (Jio Free Recharge). किंवा तुम्ही गरजेनुसार 292 दिवसांसाठी वैध असणाऱ्या रिचार्ज प्लॅनची निवड करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला दर दिवसाला 2.5GB डेटा दिला जाईल, म्हणजेच तुम्ही एकूण 630GB डेटाचा वापर करू शकता. बाकी रिचार्ज प्लॅन्स प्रमाणे इथे कंपनी तुम्हाला अमर्यादित वोईस कॉल, दर दिवशी 100 एसएमएस आणि सोबतच इतर जिओ सबस्क्रिप्शन्स मोफत फायदा मिळवून देईल.

ग्राहकांचे नवीन वर्ष आकर्षक आणि दमदार बनवण्यासाठी कंपनीने अश्या काही विशेष सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्ही जर का जिओचे ग्राहक असाल तर नक्कीच त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा माय जिओ एप डाऊनलोड करून अशा प्रकारच्या विविध प्लॅन्सबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.