बिझनेसनामा ऑनलाईन । प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे ऑफर्स आणि रिचार्ज प्लान आणत असते. ज्यामुळे ग्राहकांना प्रचंड फायदा होतो. देशभरात रिलायन्स जिओ चे युजर्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर जिओ कंपनी एअरटेल आणि VI सोबत स्पर्धा करते. त्यामुळे दोन्ही कंपन्या एकमेकापेक्षा जास्त ऑफर्स आणण्याचा प्रयत्न करत असतात. आता रिलायन्स जिओ ने स्वस्तात मस्त असे दोन नवीन प्लॅन्स लॉन्च केले आहेत. ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त हायस्पीड डेटा मिळू शकतो.
रिलायन्स जिओ 19 रुपये वाला प्रिपेड प्लॅन
रिलायन्स जिओ कंपनीच्या या प्रीपेड प्लॅन मध्ये 19 रुपयात 1.5 जीबी डाटा ऑफर केला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी युजर्सच्या प्रीपेड प्लॅन एवढीच असते. यापूर्वी जिओने 15 रुपयांचा प्रिपेड प्लॅन आणला होता ज्यामध्ये यूजर्सना 1 GB डेटा दिला जातो. मात्र आता त्यामध्ये फक्त ४ रुपये घातले कि तुम्हाला 1.5 जीबी इंटरनेट डाटा मिळू शकेल. यांनी तुम्ही इंटरनेटचा भरपूर आनंद घेऊ शकाल.
रिलायन्स जिओ 29 रुपये वाला प्रिपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅन मध्ये 29 रुपयांत 2.5 जीबी डेटा दिला जात आहे . या पॅक ची व्हॅलिडीटी युजर्सने रिचार्ज केलेल्या प्रीपेड प्लॅन बरोबरच असते. यापूर्वी जिओने आपल्या डेटा अडोन प्लॅन मध्ये 25 रुपयांचा 2GB डेटा प्लॅन ग्राहकांना आणला होता. आता मात्र यामध्ये फक्त 4 रुपये अधिक खर्च करून 2GB ऐवजी 2.5GB डेटा तुम्ही मिळवू शकता. Jio चे हे दोन्ही प्लॅन ग्राहकांसाठी आणि खास करून ज्यांना इंटरनेट जास्त हवं असत अशा लोकांसाठी खूपच उपयुक्त आहे.