बिझनेसनामा ऑनलाईन । रिलायन्स जिओ कंपनी आपल्या युजर्ससाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणत असते. जेणेकरून या ऑफर्सचा लाभ त्यांच्या यूजर्सला मिळेल. नुकताच कंपनीने मोबाईल सेवा सुधारण्यासाठी जिओ युजर्सला जिओ प्लसच्या पोस्टपेड सुविधा दिल्या आहेत. त्याचबरोबर आता जिओ पोस्टपेड प्लॅन वर 30 दिवसांची फ्री चाचणी देणार आहे. यामध्ये 399 आणि 699 रुपयांचा प्लान टेस्टिंग साठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे दोन्ही प्लॅन नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. या दोन्ही पोस्टपेड प्लानची निवड करून यूजर्स 30 दिवसांची फ्री चाचणी घेऊ शकतात.
जिओ प्लस पोस्टपेड प्लॅन
जिओ प्लस पोस्टपेड प्लॅन हा फॅमिली प्लॅन असून ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने जिओ कडून विनामूल्य ऑफर करण्यात आली आहे. यासाठी जिओ ने फ्री ट्रायल दिलेली आहे. म्हणजेच या प्लॅनवर ग्राहकांना पैसे खर्च करावे लागणार नसून युजर्सला फक्त कनेक्शन घेणे गरजेचे आहे. म्हणजेच जर तुम्ही जिओ प्रीपेड प्लॅन युजर्स असाल तर या प्लॅन साठी तुम्ही पोस्टपेड मध्ये सिम स्विच करू शकतात. यामुळे तुम्हाला पोस्टपेड प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येईल. या पोस्टपेड प्लॅन साठी देण्यात आलेल्या दोन फ्री प्लॅनची आज आपण माहिती घेणार आहोत.
रिलायन्स जिओ 399 पोस्टपेड प्लॅन
जिओचा हा पोस्टपेड प्लॅन 399 च्या किमतीत उपलब्ध असून यामध्ये 75 GB डेटा देण्यात आलेला आहे. या प्लान साठी तुम्ही 99 रुपये एका कनेक्शनसाठी देऊन तीन अतिरिक्त कनेक्शन घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये प्रत्येक कनेक्शन ला दर महिन्याला पाच जीबी डेटा मिळतो. त्याचबरोबर तिन्ही कनेक्शन्सला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100 एसएमएस, देण्यात येतात. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये 5G डेटा ऑफर करण्यात आला आहे. जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड आणि जिओ टीव्ही चे सबस्क्रीप्शन देखील या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला मिळू शकतात.
रिलायन्स जिओ 699 पोस्टपेड प्लॅन
रिलायन्स जिओचा हा पोस्टपेड प्लॅन 699 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असून यामध्ये दर महिन्याला 100 जीबी डेटा दिला जातो. त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला 99 रुपयात तीन सिम एक्स्ट्रा दिले जातात. त्याचबरोबर प्रत्येक सिम वर अनलिमिटेड कॉलिंग सह 100 एसएमएस सेवा देण्यात आलेली असून या प्लॅनमध्ये दररोज 5G डेटा ऑफर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा प्लॅन जिओ वेलकम ऑफर साठी देखील उपलब्ध असून यामध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड चे सबस्क्रीप्शन देखील उपलब्ध आहे.