बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून रिलायन्स जिओकडे पाहिले जाते. आपल्या ग्राहकांना कमीत कमी पैशात जास्त फायदे मिळावे म्हणून जिओ सातत्याने प्रयत्नशील असते. त्यातच भारतात जिओची फाईट एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासोबत असते. मात्र आता जिओने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने आपला सर्वात स्वस्त असा 119 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) बंद केला आहे. त्यामुळे आता 149 रुपयांचा रिचार्ज हा जिओचा सर्वात स्वस्त असा रिचार्ज ठरेल.
खरं तर जिओचा 119 रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन सर्वांना परवडणारा होता. एअरटेल ने देखील परवडणाऱ्या किमतीत असलेला प्लॅन कॅन्सल केला होता. जिओ टेलिकॉम कंपनीने 2021 मध्ये आर्थिक महागाई वाढल्यानंतर हा स्वस्तात मस्त असा प्लॅन लॉन्च केला होता. या प्लॅनमध्ये 14 दिवसांची व्हॅलिडीटी दिलेली होती तर 1.5 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग या सोबतच 100 एसएमएसची सुविधा उपलब्ध होती. परंतु आता कंपनीने हा प्लॅन बंद करून जिओच्या यूजर साठी नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. प्रति युजर्स सरासरी महसूल सुधारण्यासाठी मदत म्हणून कंपनीने हा प्लॅन रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी रिलायन्स जिओ ने 149 रुपयांचा प्लॅन (Jio Recharge Plan) उपलब्ध करून दिला आहे.
149 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन– (Jio Recharge Plan)
रिलायन्सने आणलेला हा 149 रुपयांचा नवीन प्लॅन 20 दिवसांसाठी व्हॅलिड आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस,आणि दररोज 1 GB डेटा देण्यात येतो. त्याचबरोबर जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड, आणि जिओ टीव्ही याचा देखील फायदा यामध्ये मिळू शकतो. परंतु हा रिचार्ज प्लान घेणाऱ्या युजर्स ला जिओ वेलकम ऑफर सुविधा उपलब्ध नाही. रिलायन्स जिओनी घेतलेल्या या निर्णयामुळे कंपनीला सरासरी महसूल सुधारण्यासाठी मदत होईल.
155 रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन
दुसरीकडे, एअरटेल कंपनीने देखील सर्वात स्वस्त प्लॅन म्हणून 155 रुपयांचा प्लॅन युजर साठी उपलब्ध केलेला आहे. यामध्ये 24 दिवसांची व्हॅलिडीटी देण्यात आलेली असून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग ची सुविधा देखील मिळते. त्याचबरोबर एअरटेलच्या 180 रुपयांचा रिचार्ज आता दोनशे रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यानुसार एअरटेल जिओ पेक्षा जास्त पैसे कमवत आहे.