Jio Recharge Plan : Jio चा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन; 84 दिवस नो टेन्शन

बिझनेसनामा ऑनलाईन । रिलायन्स जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये काही प्लॅन्स (Jio Recharge Plan) आणत असते. जेणेकरून त्याचा फायदा ग्राहकांना होऊ शकेल. रिलायन्स जिओ ही कंपनी एअरटेल आणि वोडाफोन आयडिया कंपनीला टक्कर देत भन्नाट ऑफर ग्राहकांसाठी घेऊन येते. त्याचबरोबर कमी किमतीमध्ये परवडणारे प्लान्स देखील रिलायन्स जिओ कंपनीकडे आहेत. जर तुम्ही सुद्धा जिओ प्रीपेड चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आज रिलायन्स जिओ घेऊन आलेले आहे 3 महिन्यांचा व्हॅलिडीटी प्लॅन. यामुळे तुम्ही 3 महिने रिचार्ज करण्याचं टेन्शन न घेता व्हॅलिडीटी प्लॅन्स वापरू शकतात.

रिलायन्स जिओ 395 रुपये रिचार्ज प्लॅन– (Jio Recharge Plan)

रिलायन्स जिओ चा हा प्लॅन 3 महिने म्हणजे 84 दिवसांसाठी उपलब्ध आहे. यामुळे आता 28 दिवसांचा रिचार्ज नं करता तुम्ही 3 महिन्यांचा रिचार्ज करू शकता. या प्लॅनमध्ये 6 जीबी डेटा देण्यात आलेला असून तुमची डाटा लिमिट संपल्यावर तुम्हाला कमी स्पीड मध्ये 64kbps डेटा मिळतो. अनलिमिटेड कॉलिंग सह 1000 sms फ्री देण्यात आलेले आहे.

या रिलायन्स जिओ 395 रुपये रिचार्ज प्लॅन मध्ये (Jio Recharge Plan) ग्राहकांना इंटरनेट डेटा कॉलिंग एसएमएस यासोबतच काही ऑफर देखील देण्यात आली आहे. या ऑफर मध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचे एक्सेस देण्यात येत आहे. त्याचबरोबर या रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला 5G सेवा देण्यात आली आहे. म्हणजे जर तुमचा स्मार्टफोन हा 5G असेल तर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकतात.