Jio Recharge Plan : Jio कडून ग्राहकांना दिवाळी गिफ्ट!! रिचार्जवर मिळणार 23 दिवसांची Extra व्हॅलिडिटी

Jio Recharge Plan : दिवाळीचा सण म्हटलं कि काही ऑफर्स आणि नवनवीन संधी उपलब्ध होणं आलंच. अनेक शॉपिंग साईट, दुकानदार आणि बाजारातील हर एक वापरी आपल्या ग्राहकांनाखुश करण्यासाठी या न त्या वस्तूंवर छोटी मोठी सूट देत असतो. आता यात नवीन नाव पाहायला मिळतंय ते जिओचं. Jio हि देशातील सर्वात अधिक वापरली जाणारी टेलिकॉम कंपनी आहे, प्रत्येक घरात एक तरी Jio चा मोबाईल किंवा सीम कार्ड नक्कीच असेल. तुमची दिवाळी खास आणि रंजक बनवण्यासाठी आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास गिफ्ट आणलं आहे. जिओ आपल्या रिचार्ज पिलांवर 23 दिवसांची Extra व्हॅलिडिटी देत आहे.

जिओची नवीन दिवाळी ऑफर: Jio Recharge Plan

Jio या दिवाळीत तुम्हाला प्रीपेड रिचार्जवर 23 दिवसांची अधिक व्हेलीडीटी देणार आहे. वार्षिक रिचार्ज यामुळे 365 दिवसांचा नाही तर 388 दिवसांचा बनला आहे. तुम्ही जर का 2,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन निवडलात तर तुम्हाला 388 दिवसांसाठी त्याचा वापर करता येईल. या प्लॅनमध्ये 2.5GB प्रती दिवस डेटा दिला जातो, आणि इंटरनेटची केपेसिटी जरीही संपली तरीही 64kbps वर इंटरनेट वापरण्याची सोय उपलब्ध आहे.

हे 5G चे युग असल्यामुळे Jio आपल्या वापरकर्त्यांना 5G सेवा देतो तसेच 100 संदेश प्रती दिवस आणि अनलिमिटेड कॉलिंग हे प्रत्येक प्लेनचे नेहमीच भाग असतात. या प्लॅन तुम्ही का विकत घ्यावा तर इथे तुम्हाला Jio Cinema, Jio Security, Jio Cloud यांसारख्या सुविधांचा विनामूल्य वापर करता येतो. आणि देश आणि विदेशात कॉलिंगच्या सुविधा (Jio Recharge Plan) दिल्या जातात. दिवाळीत जिओ कडून दिली गेलेली हि हमखास ऑफर आहे, त्यामुळे या दिवाळीत ऑफरचा फायदा घेऊन आपल्या माणसांना भरपूर शुभेच्छा द्या.