बिझनेसनामा ऑनलाईन । रिलायन्स जिओ (Jio Recharge Plan) आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करत असते. ग्राहकांना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त सुविधा देण्याकडे कंपनीचा भर असतो. त्यातच टेलिकॉम क्षेत्रातही स्पर्धा असल्याने एअरटेल, आयडिया आणि वोडाफोनशी जीओचा थेट सामना असतो. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जिओ सतत वेगवेगळे प्लॅन आणत असते. आत्ताच रिलायन्स जिओच्या प्रीपेड यूजरसाठी कंपनीकडून नवीन दोन प्लॅन लॉन्च करण्यात आले आहेत. या प्लानमध्ये नेटफ्लिक्सचे सबस्क्रीप्शन फ्री मध्ये देण्यात येणार असून 400 मिलियन जिओ प्रीपेड कस्टमरला या नेटप्लिक्स सबस्क्रीप्शन चा फायदा होईल.
1099 रुपयांचा प्रीपेड प्लॅन–
रिलायन्स जिओने आणलेल्या ऑफर मधील हा प्लॅन 84 दिवसांसाठी व्हॅलिड आहे. याची किंमत 1,099 रुपये एवढी आहे. यामध्ये नेट प्लीज सबस्क्राईब फ्री देण्यात आले आहे. परंतु तुम्ही या प्लॅन नुसार मोबाईलवरच नेटफ्लिक्स बघू शकतात. या रिचार्ज प्लान मध्ये युजर्स ला अनलिमिटेड 5G डेटा, जिओ वेलकम ऑफर, देण्यात येत आहे. या रिचार्ज प्लॅन अंतर्गत दररोज 2 GB डेटा देण्यात येईल. यासोबतच अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग ची सुविधा देखील यामध्ये आहे.
1499 रुपयाचा प्रीपेड प्लॅन–
या ऑफरचा दुसरा प्लॅन हा देखील 84 दिवसांसाठी व्हॅलिड आहे. यामध्ये नेटफ्लिक्स सबस्क्रीप्शन फ्री मध्ये देण्यात येत असून तुम्ही मोबाईल सोबतच मोठ्या स्क्रीनवर देखील बघू शकतात. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा जिओ वेलकम ऑफर्स उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा देण्यात येतो. यासोबतच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील देण्यात आली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच नेटफ्लिक्समध्ये तेलुगु भाषेमधील काही मुव्हीज या आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडलेल्या आहेत. यामध्ये बीस्ट, गॉड फादर, धमाका, लव टुडे, दसारा, विरूपक्षम हे सर्व चिंत्रपट या नेटफ्लिक्सच्या प्लॅटफॉर्मवर दिसतील. यासोबतच लोकल हिट सिरीयल आणि मूव्हीज मध्ये दिल्ली क्राईम, राणा नायडू, क्लास, कोहरा, डार्लिंग, आरआरआर, काठीयावाडी, मोनिका ओ माय डार्लिंग, शहजादा, लस्ट स्टोरीज यासारखे वेगवेगळे मूवी तुम्ही बघू शकतात. सिरीज बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये मनी हिस्ट, स्क्विड गेम, नेवर हॅव आई एवर, स्ट्रेंजर थिंग्स अँड वेडनसडे यासारख्या सिरीज उपलब्ध आहेत.