Jio Recharge Plan : Jio ने आणला ग्राहकांसाठी नवा प्लॅन; रोज 2 GB Data सह वर्षभर घ्या OTT चा आनंद

Jio Recharge Plan । तुम्ही Jio चे वापरकर्ते आहात का? कारण आजची हि बातमी तुमच्यासाठी खास आनंदाची आहे. Jio प्रत्येकवेळी आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी अनेक प्लॅन्स घेऊन येत असतो. तुम्ही आजूबाजूला नक्कीच पाहिलं असेल असेल की OTT चा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात विशेषतः तरुण मंडळींचा समावेश झालेला दिसतो, आणि म्हणूनच Jio सारख्या कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी काही कॉम्बो पॅक देऊ केले जातात, ज्यात Netflix, Disney Plus hotstar, Sony LIV Zee5 यांसारख्या प्लॅटफॉर्मसवर‌ आनंद घेण्याची घेण्याची संधी मिळते .आता पुन्हा एकदा Jio आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर घेऊन आलं आहे, तर काय आहे ही ऑफर जाणून घेऊया…

कशी असेल Jio नवीन ऑफर: Jio Recharge Plan

Jio च्या या नवीन प्लॅनची किंमत 3,227 रुपये अशी आहे, आणि हा प्लॅन तुम्ही पूर्ण एका वर्षासाठी वापरू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB इंटरनेट डेटा चा वापर करता येतो तसेच दिवसाची मुदत संपल्यानंतर 64kbpsने इंटरनेटचा वापर करणे शक्य आहे आहे. एकंदरीतच काय तर या प्लॅनमध्ये (Jio Recharge Plan) तुम्हाला अमर्यादित इंटरनेट सेवा पुरवली जाते. Jio च्या बाकी प्लॅन्स प्रमाणे इथे सुद्धा तुम्हाला व्हॉइस कॉलिंग एकदम मोफत आहे. तसेच दररोज शंभर SMS तुम्ही पाठवू शकता. आनंदाची बाब म्हणजे या प्लॅनमध्ये काही OTT च्या सुविधा सामावलेल्या आहेत, जसे की इथे तुम्हाला प्राईम व्हिडिओजचा मोफत आनंद घेता येतो, एवढेच नाही तर सोबत Jio TV टीव्ही, Jio Cinema आणि जिओ क्लाऊड हे देखील विनामूल्य उपलब्ध आहेत.

Jio घेऊन आलाय जिओ भारत सिरीज:

मोबाईलच्या क्षेत्रात एक तुफान आणण्यासाठी आता Jio पुन्हा एकदा सज्ज झाला आहे व त्यांनी Jio Bharat B1 नावाचा एक नवीन 4G फोन बाजारात विक्रीसाठी खुला केला आहे. आपण बाजारात उपलब्ध असलेल्या जिओ भारत V2 आणि K1 यांचं पत्रिकरण करून बनवलेलं ॲडव्हान्स वर्जन म्हणू शकतो. हा मोबाईल हाताळायला एकदम सोपा असून त्याची किंमत फक्त 1299 रुपये आहे, हा Jio चा सर्वात स्वस्त असा फोन असून त्याची बॅटरी 2000mAh एवढी आहे.