Jio Space Fiber: रिलायन्स जिओ या कंपनीकडून देशात अनेक नवनवीन बदल घडवले जातात. यातीलच एक म्हणजे आता रिलायन्स जिओकडून देशात पहिल्यांदा सेटलाईटवर चालणाऱ्या गिगा बीट ब्रोडबेंड सेवेची सुरुवात केली जाणार आहे. याला कंपनीने Jio Space Fiber असे नाव दिलेले असून देशातील कानाकोपऱ्यात मुबलक इंटरनेट सेवा पुरवणे ते त्यांचे यामागील ध्येय आहे. याबद्दल बोलताना रिलायन्स जिओ चे सर्वेसर्वा आकाश अंबानी म्हणाले की देशातील शिक्षण, सरकारी, आरोग्य आणि आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांना याचा अधिकाधिक वापर करता येणार आहे.
ही दिवसांपूर्वी आपण एक बातमी पाहिली होती ज्यात इलोन मस्क देशात स्टार लिंक नावाची सेटलाईट सुरू करू पाहत होते, ज्याचा वापर आणि आपल्या देशातील इंटरनेट सेवेला मजबुती मिळणार होती. आता रिलायन्स कंपनीकडून सुरू करण्यात येणाऱ्या जिओ स्पेस फायबरचा उद्देश काहीसा याच प्रमाणे आहे. या प्रकल्पामध्ये जिओनी SES हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला असून ते मिडीयम अर्थ औरबीट(MEO) या आधुनिक सॅटॅलाइट टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. इथे O3b आणि O3b mPOWER सॅटेलाईट चा वापर करून परवडणाऱ्या खर्चात जिओ आपल्या ग्राहकांना नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. सध्या या नेटवर्कची पाहणी करण्यासाठी गुजरात मधील गीर, चंदीगड मधील कोरबा अश्या ठिकाणी याची चाचणी केली जात आहे.
जियो देशातील सर्वोत्तम नेटवर्क: Jio Space Fiber
रिलायन्स जिओला आपल्या देशात भरपूर मागणी आहे. देशातील कित्येक कानाकोपऱ्यातत या कंपनीचे अनेक ग्राहक पाहायला मिळतात. सूत्रांच्या माहितीप्रमाणे रिलायन्स जिओचे देशात 450 मिलियन पेक्षा जास्त ग्राहक आहेत, जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर यांचा वापर करतात. आता नवीन येऊ पाहणारा स्पेस फायबर हा विविध कोपऱ्यामध्ये जाऊन लोकांपर्यंत इंटरनेटची सेवा पोहोचवणार आहे (Jio Space Fiber). जसे की आपण सगळेच जाणतो की आपल्या देशात अशा अनेक जागा आहेत ज्यांचे अजूनही आधुनिकीकरण झालेले नाही, यामध्ये जाऊन 5G नेटवर्क उपलब्ध करून देणे असा त्यांचा मानस आहे.