बिझनेसनामा ऑनलाइन | रिलायन्स जिओ कंपनी सतत आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आणत असते. परंतु आता जिओ रिलायन्स कंपनी तुमच्यासाठी जिओचा व्हीआयपी नंबर (Jio VIP Number) घेऊन आली आहे. जर तुम्ही देखील व्हीआयपी नंबरचे शॉकिंग असाल तर तुम्ही 1 हजार रुपयांच्या आत साध्या प्रोसेस च्या माध्यमातून हा व्हीआयपी नंबर मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रिलायन्स जिओ ही टेलिकॉम इंडस्ट्री मधील सर्वात लोकप्रिय अशी कंपनी आहे. या कंपनीकडून सतत ग्राहकांना खुश करण्यासाठी प्लान्स आखले जातात. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना ऑड नंबर किंवा त्यांचा लकी नंबर दैनंदिन आयुष्यात त्यांच्या सोबतच असावा आणि प्रत्येक गोष्टींमध्ये त्याचा वापर व्हावा असं वाटत असतं. यासाठी जिओ आता व्हीआयपी नंबर (Jio VIP Number) घेऊन आला आहे. त्यासाठी तुम्हाला जिओच्या www.jio.com/selfcare/choice-number या वेबसाईटवर किंवा www.jio.com या वेबसाईट वर भेट द्यावी लागेल. जेणेकरून तुम्ही व्हीआयपी नंबर घेण्यासाठी च्या प्रोसेस वर पोहोचाल.
या स्टेप्स फॉलो करा- (Jio VIP Number)
1) वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा तुमचा नंबर टाकावा लागेल.
2) त्यानंतर तुमचा नंबर वर आलेल्या ओटीपी वरून लॉगिन करा. 3)तुम्हाला तुमचा आवडता किंवा हवा असलेला नंबर टाकावा लागेल.
3) त्यानंतर तुम्हाला काही मोबाईल नंबर दाखवले जातील. त्यानंतर तुम्ही टाकलेला नंबर स्क्रीनवर दिसेल.
5) त्या नंबर समोर असलेल्या बॉक्समध्ये क्लिक करून तुम्ही तो नंबर खरेदी करू शकतात. याच प्रोसेस वेळी तुम्हाला 499 रुपये भरून हा नंबर दिला जाईल.