Jio World Plaza : देशातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार

बिझनेसनामा ऑनलाईन । तुम्हाला शॉपिंगची आवड आहे का? तर हि बातमी तुमच्यासाठी फारच आकर्षक ठरू शकते, कारण देशात लवकरच सर्वात मोठा शॉपिंग मॉल उघडला जाणार आहे. Jio World Plaza असे या मॉल चे नाव असून मुकेश अंबानी यांच्या रिलायंसकडून हा मॉल सुरु केला जाणार आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 7,50,000 स्क्वेअर फूट परिसरात हा भव्य असा मॉल उभारण्यात आला आहे.

कसा असेल Jio World Plaza?

हा मॉल देशातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल ठरणार आहे. इथे देशातील अनेक मोठमोठाले उद्योजक आपल्या उत्पादनांची विक्री करणार आहेत. या महागड्या उत्पादांमध्ये बुल्गारी, कात्याय, लुई व्हिटॉन, व्हर्साचे, व्हॅलेंटिनो, मनीष मल्होत्रा, अबू जानी, संदीप खोसला, पॉटरी बार्न यांचा समावेश असणार आहे. देशात आज पर्यंत अश्या मॉलची सेवा उपलब्ध झाली नव्हती. कदाचित आपले अधिकाधिक देशवासी मध्यमवर्गीय असल्यामुळे असेल, पण DFL एम्पोरियो, चाणक्य मॉल, यूबी सिटी आणि पॅलेडियम यांच्याशिवाय देशात अजून असे अलिशान मॉल नाहीत. लक्झरी मार्केट 2022 आणि 2026 दरम्यान दरवर्षी सुमारे 12% वाढून सुमारे $5 अब्ज होईल. चीनमधील अर्थव्यवस्थेत मंदी आल्याने भारतात डिझायनर उत्पादनांची मागणी लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. भारतात या लक्झरी ब्रँडची विक्री सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच हे सर्व ब्रँड भारतात येत आहेत

ग्राहकांचा दृष्टीकोन बदलतोय:

समोर आलेली माहिती सांगते कि आजकाल लोकांची खरेदी आणि महागड्या वस्तूंकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. काही वर्षांपूर्वी आपण फक्त मॉल (Jio World Plaza) कसा असतो, हि संकल्पना नेमकी काय आहे आणि महागड्या वस्तू कश्या असतात हे जाणून घेण्यासाठी लोकांची पाऊलं मॉलकडे वळायची. मात्र आता हा दृष्टीकोन बदलला आहे, अधिकाधिक ग्राहक महागड्या वस्तूंची खरेदी करतात. भारतातील महागड्या वस्तूंमध्ये घड्याळ आणि दागिन्यांचा समावेश होतो.