Jio World Plaza मध्ये ‘या’ ब्रँडेड कंपन्या विकणार आपले प्रॉडक्ट्स

बिझनेसनामा ऑनलाईन । मुकेश अंबानी हे आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या रिलायन्स कंपनीकडून जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. यातीलच एक म्हणजे जिओ प्लाझा. (Jio World Plaza) जिओ प्लाझा हा एक मॉल आहे, आणि हा साधा सुधा मॉल नसून देशातील सर्वात श्रीमंत मॉल आहे. इथे अनेक श्रीमंत ब्रँड आपल्या वस्तूंची विक्री करतात. पण तुम्हाला माहिती आहे का कि देशातील नेमके कोण कोणते कोणते ब्रँड इथे आपला व्यापार करतात? माहिती नसेल तर हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचा, कारण आज आम्ही तुम्हाला या बद्दल भरपूर माहिती देणार आहोत..

हा आहे देशातील सर्वात मोठा मॉल: Jio World Plaza

देशातील सर्वात मोठ मोठे ब्रँड जिथे आपल्या वस्तूंची विक्री करणार आहेत असा हा अंबानी समूहाचा मॉल (Jio World Plaza) सर्वात मोठा आणि अलिशान असा आहे. 1 नोव्हेंबर रोजी अनेक प्रसिद्ध हस्तींच्या उपस्थिती या मॉलचे उद्घाटन करण्यात आले आहे. तुम्हाला माहिती आहे का इथे काही साध्यासुध्या वस्तूंची विक्री केली जाणार नाही तर मोठमोठाल्या ब्रँड सोबत अंबानींनी हातमिळवणी केली आहे. दरम्यान केवळ भारतातीलच नाही तर परदेशातून अनेक ब्रेड्स आपल्या वस्तूंची विक्री इथे करणार आहेत.

कोणते आंतरराष्ट्रीय ब्रँड इथे पाहायला मिळणार?

अरमानी कॅफे आणि रेस्टॉरंट्स ही इटालियन लक्झरी डिझायनर जियोर्जियो अरमानी यांच्या मालकीची कंपनी आहे. आणि वर्ष 2000 पासून रिलायन्स कंपनी भारतात त्यांनी केफे उघडावा यासाठी अरमानीशी बोलणी करत आहे. याशिवाय बालेंसियागा नावाचा प्रसिद्ध ब्रेंड सुद्धा अंबानींच्या अलिशान मॉलमध्ये (Jio World Plaza) स्थान निर्माण करणार आहे. EL&N Cafe,रीमोवा, पोट्रीबर्न किड्स यांसारख्या एक ना अनेक अंतराष्ट्रीय कंपन्या आता भारतात व्यवसाय सुरु करणार आहेत.