JioMotive : आता 4,999 रुपयांत साध्या गाडीला बनवा ‘Smart Car’; Jio ने आणलं खास उपकरण

JioMotive: आजकाल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात किती जोरात वाढ होताना दिसते. कालपर्यंत माणसाकडून तासंतास लागून होणारी कामं आज Chatgpt सारखं तंत्र अगदी पटापट करून देतं. अश्यातच आता रिलायंस कंपनीकडून या क्षेत्रात एक मोठा बदल आणण्यात आला आहे. रिलायन्सने JioMotive नावाचे एक डिव्हाइस आणलं आहे. या डिव्हाईस मध्ये तुमच्या गाडीला स्मार्ट गाडी बनवण्याची क्षमता आहे. आत्तापर्यंत तुम्ही स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फोन अशी नावं ऐकली असतील पण आता स्मार्ट कार म्हणजे काय हे पाहूयात आणि जिओ यात कसा बदल आणतोय हे समजून घेऊया.

Jioने आणली नवीन जादू: JioMotive

जिओने आणलेल्या या नवीन डिव्हाइसची मदत घेऊन तुम्ही गाडीचे इंजिन ठीक आहे कि नाही, गाडीचा ड्रायविंग पर्फोर्मंस कसा आहे किंवा लोकेशन याबद्दल बिनचूक माहिती मिळवू शकता. हा डिव्हाइस जर का तुम्ही पाहिलात तर एवढी कामे हे डिव्हाईस खरोखर करू शकेल अशी खात्री वाटणार नाही पण तरीही हि गोष्ट खरी आहे. तुमच्या दररोज वापरात असलेल्या गाडीला हा एक डिव्हाइस स्मार्ट गाडी बनवून देऊ शकतो आणि त्याची किंमत देखील 4,999 रुपये एवढीच आहे.

हा डिव्हाइस असे काम करेल:

लक्ष्यात घ्या कि हा डिव्हाइस वापरण्यासाठी तुम्हाला कुणा मोठ्या इंजिनियर किंवा मेकानिक जवळ जाण्याची गरज नाही. जिओ मोटिव्ह हा Plug-and-Play डिव्हाइस असल्यामुळे तुम्ही केवळ गुगल प्ले वरून डाऊनलोड करून याचा वापर अगदी आरामात करू शकता. या डिव्हाइसचा वापर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे (JioMotive):

१) सर्वात आधी जिओ थिंग्स हा एप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करून घ्या.

२) त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर समाविष्ट करून लॉग-इन करा आणि ‘+’ या चिन्हावर जाऊन जिओ मोटिव्ह हा पर्याय निवडा.

३) इथे IMEI नंबर समाविष्ट करून पुढची प्रक्रिया सुरु करायची आहे, यात तुमच्या गाडीच्या विषयी महत्वाची माहिती द्यावी लागेल, ज्यात गाडीचे नाव, मॉडेल, फ्युअल टाईप, रजिस्टरेशन नंबर इत्यादी माहिती सामावलेली असते.

4) यानंतर JioMotive ला तुमच्या गाडीच्या OBD पोर्ट सोबत जोडा, यावेळी तुम्हाला उत्तम नेटवर्क सेवा मिळत असायला हवी.

५) आता कंपनीच्या सर्व नियम आणि अटींना स्वीकृती द्या. यावेळी तुमची गाडी चालू अवस्थेत असणं आवश्यक आहे. आता ‘JioJCR1440’ हा पर्याय निवडून प्रक्रिया सुरु ठेवा .

६) आता कंपनीकडून तुम्हाला एक संदेश पाठवला जाईल यामुळे 10 मिनिटांसाठी गाडीचे इंजिन सुरु ठेवा, कंपनी तुम्हाला एक एक रिक्वेस्ट पाठवेल जी स्वीकारल्यानंतर हा डिव्हाइस तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करेल.