Job Update : Micron Technology भारतात उभारणार सेमीकंडक्टर प्लांट, 5000 नोकऱ्यांची संधी!

बिझनेसनामा ऑनलाइन | देशात बेरोजगारीचे संकट असताना तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कम्प्युटरची चिप बनवणारी अमेरिकन कंपनी मायक्रोन टेक्नॉलॉजी (Micron Technology) भारतात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच तब्बल 2.7 अरब डॉलरची गुंतवणूक सुद्धा करणार आहे. यामुळे भारताला सेमिकडक्टर हब बनवण्यासाठीच्या प्रयत्नाला लवकरच यश मिळू शकते. (Job Update)

भारतातील गुजरात मध्ये हे सेमीकंडक्टर हब सुरू करण्यात येणार आहे. मायक्रोन टेक्नॉलॉजीची भारतात ही सर्वात पहिली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून सेमी कण्डक्टर टेस्टिंग अँड पॅकेजिंग युनिट यासाठी मायक्रोन कंपनी लवकरच इन्व्हेस्टमेंट करणार आहे.अमेरिका दौऱ्यावर पीएम नरेंद्र मोदी यांनी मायक्रोनचे सीईओ संजय मेहरोत्रा यांच्याशी बैठकीत चर्चा करून सेमी कण्डक्टर मॅन्युफॅक्चरिंग ला वाव देण्यासाठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले. त्याचबरोबर अमेरिकी सेमीकंडक्टर कंपनीला 1.34 अरब डॉलर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह चा देखील लाभ मिळणार आहे.

या बैठकीमध्ये संजय मेहेरोत्रा म्हणाले की, भारत सेमी कंडक्टर इकोसिस्टम डेव्हलप करण्यासाठी जो उत्साह दाखवत आहे. तो अप्रतिम आहे. त्यांनी भारत सरकार आणि या प्लांट मध्ये सहभागी अधिकाऱ्याचे, आणि इन्वेस्टमेंट दारांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की भारतातील आमचा हा पहिलाच प्लॅन असून आम्ही भारतासोबत जगभरात आमच्या ग्राहकांना अप्रतिम सुविधा देऊ.

दरम्यान, मायक्रोन कंपनी गुजरात मध्ये सेमीकण्डक्टर प्लांट लावणार असून तो 2 पार्ट मध्ये डेव्हलप केला जाईल. यासाठी लागणारा खर्च म्हणून कंपनी स्वतः 82.5 करोड डॉलर इन्व्हेस्ट करेल आणि बाकी इन्व्हेस्टमेंट राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येईल. या प्लांट मध्ये पहिल्या टप्प्यात 500 हजार चौरस फूट नियोजित क्लीनरूमचा समावेश असेल. त्यानंतर 2024 मध्ये ते सुरु करण्यात येईल. मायक्रोन टेक्नॉलॉजीनुसार, दोन्ही टप्प्यांतून जवळपास 5,000 नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे तर 15,000 लोकांना नंतरच्या काळात नोकऱ्या मिळतील.