नवी दिल्ली । जर तुम्ही परदेशात नोकरी करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही या अपडेट मध्ये तुम्हाला अशा तीन प्रमुख देशांबद्दल माहिती देणार आहोत जिथे नोकरीचा व्हिसा (Job Visa) अगदी सहज उपलब्ध होतो. बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या पगाराच्या अनेक नोकरीच्या संधी सध्या उपलब्ध आहेत. पदवीचे शिक्षण झालेले असेल आणि तुम्हाला ठीकठाक इंग्रजी बोलता येत असेल तर तुम्ही हि संधी अजिबात सोडू नका.
जर्मनी (Germany Jobs)
युरोपियन युनियनच्या बाहेरील देशांतील नागरिकांना 9 महिन्यांपर्यंत नोकरी शोधण्यासाठी जर्मनी Job Seeker Visa देत आहे. जर्मनीमध्ये जॉब सीकर व्हिसासाठी अर्ज करताना, तुमच्याकडे कोणत्याही व्यवसायातील कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव, तिथे राहण्यासाठी आवश्यक निधी आणि शैक्षणिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुमची पात्रता देखील जर्मनीमधील समतुल्य किंवा जर्मन डिप्लोमा म्हणून ओळखली जाणे आवश्यक आहे.
ऑस्ट्रिया (Australia Jobs)
ऑस्ट्रियामध्ये नोकरी शोधण्यासाठी तुम्हाला ६ महिन्यांचा व्हिसा मिळू शकतो. व्हिसासाठी (Job Visa) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना यासाठी निश्चित केलेल्या यादीनुसार किमान 70 गुणांची आवश्यकता आहे. जर तुम्हाला जॉब सीकर व्हिसाच्या दरम्यान नोकरी मिळाली तर तुम्ही रेड-व्हाइट-रेड कार्डसाठी देखील अर्ज करू शकता. याद्वारे तुम्ही तेथे काम आणि निवास परवाना मिळवू शकता. लाल-पांढरे-लाल कार्डधारकाला ऑस्ट्रियामध्ये दीर्घकाळ काम करण्याची आणि राहण्याची परवानगी आहे.
स्वीडन (Sweden Jobs)
स्वीडनमध्ये नोकरी शोधणाऱ्या व्हिसासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. याशिवाय, स्वीडनमध्ये राहण्यासाठी तुमच्याकडे वैध पासपोर्ट, आवश्यक निधी आणि आरोग्य विमा असणे आवश्यक आहे. तुम्ही स्वीडनमध्ये 3 ते 9 महिन्यांसाठी जॉब सीकिंग व्हिसासाठी अर्ज करू शकता.