Joyalukkas Jewellery । वर्ष 2023 मध्ये फोर्ब्सची यादी जाहीर करण्यात आली ज्यात अंबानी यांचे नाव सर्वात आधी पाहायला मिळते, आणि त्यांच्या खालोखाल अदानी यांचे नाव आहे. भारतासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे अदानी आणि अंबानी यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक उद्योगपतींचा यात समावेश झाला आहे. आता इथे समाविष्ट असलेल्या अजून एका उद्योगपतीची गोष्ट पाहूयात, शाळा अर्थवत सोडून सुद्धा अब्जाधीश झालेल्या या माणसाची नेमकी मेहनत काय आणि किती होती हे जाणून घेऊयात..
जॉय अलुकासचे मालक: Joyalukkas Jewellery
आज आपण बोलतोय भारतातील एका श्रीमंत सोन्याच्या दुकानाबद्दल ज्याची ख्याती केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा आहे. याचे पूर्ण कुटुंबच दागिन्यांच्या व्यवसायात आहे, आणि जॉय अलुकासच्या वडिलांनी म्हणजेच वर्गीस अलुकास यांनी या दुकानाचा पाया 1956 साली केरळ येथून रोवला होता. आज या व्यवसायाला सातासमुद्रापार घेऊन जाण्याचं काम जॉय अलुकास यांनी केलं आहे. वर्ष 1987 मध्ये त्यांनी पहिल्यांदा हा व्यवसाय अबुधाबीमध्ये नेला होता. इथे होणारी भरगोस कमी आणि नफ्याच्या जोरावर त्यांनी हळूहळू स्वतःच्या नावे सोन्याच्या विक्रीचा व्यवसाय उभा केला आणि आज जॉय अलुकास हे सोन्याचे व्यापारी सर्वात प्रसिद्ध आहेत.
अब्ज्याधीश जॉय अलुकास:
आज हि कंपनी हजार आणि कोटी नाही तर चक्क अब्ज रुपयांची उलाढाल करते. कंपनीचे एकूण मूल्य 4.4 अब्ज डॉलर्स आहे, वर्ष 2022 आणि 23 या आर्थिक वर्षात भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास कंपनीने 14512 रुपयांचा व्यवसाय केला आहे, दरम्यान कंपनीने 899 रुपयांचा नफा कमावला होता (Joyalukkas Jewellery). अजून मेहनत आणि चिकाटीने व्यवसाय वाढवण्यासाठी कंपनीने आपले ध्येय उंचावले आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2024 साठी 17500 कोटीचे उत्पन्न आणि 1100 कोटी रुपयांचा नफा कमावण्याचे ध्येय ठेवले आहे. जॉय अलुकासचे जगभरात 160 शोरूम्स आहेत, ज्यापैकी 100 शोरूम्स भारतात व्यवसाय पाहतात. यातही वाढ करत भारतात 130 शोरूम्स उभारण्याची त्यांची योजना आहे, तसेच परदेशातही आपला व्यवसाय वाढवण्याचे उदिष्ट ठेऊन ते काम करतायत. यात 2400 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, येत्या दोन वर्षात्त कम्पनिअक्दुन हे उदिष्ट सध्या केले जाईल.या अब्ज्याधीश कंपनीमध्ये 9000 पेक्षा जास्ती कर्मचारी काम करतात, आणि एक कोटी पेक्षा अधिक त्यांचे ग्राहक जगभरात पसरलेले आहेत.