JSW इन्फ्रास्ट्रक्चर IPO आणणार; 2800 कोटी रुपये उभारण्याची योजना

बिझिनेसनामा ऑनलाईन । ज्येष्ठ उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्या मालकीच्या JSW समूहाची पायाभूत सुविधा कंपनी JSW इन्फ्रास्ट्रक्चर IPO आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने स्टॉक मार्केट रेग्युलेटर SEBI (Securities and Exchange Board of India) कडे ड्राफ्ट पेपर (DRHP) सुद्धा दाखल केले आहे. आहे. JSW इन्फ्रास्ट्रक्चरIPO च्या माध्यमातून तब्बल 2800 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.

JSW इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या IPO द्वारे उभारलेल्या 2800 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासोबत विस्तारावर लक्ष केंद्रित करेल. JSW इन्फ्रास्ट्रक्चर ही JSW समूहाची शेअर बाजारात लिस्टेड होणारी तिसरी कंपनी असेल. यापूर्वी JSW समूहाच्या JSW एनर्जी आणि JSW स्टील या कंपन्या सूचीबद्ध आहेत. जेएसडब्ल्यूच्या प्रवक्त्याना याबाबत विचारलं असता त्यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे .

JSW इन्फ्रास्ट्रक्चर ही भारतीय कंपनी असून पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी, बांधकाम आणि प्रकल्पांशी संबंधित सेवा प्रदान करते. या कंपनीची स्थापना 1984 मध्ये झाली असून सध्या देशातील सर्वात मोठी इंफ्रास्ट्रक्चर कंपनी म्हणून JSW इन्फ्रास्ट्रक्चरकडे बघितलं जाते. JSW इन्फ्रास्ट्रक्चरने देशातील विविध क्षेत्रात अनेक मोठे प्रकल्प राबवले आहेत.