Kanika Tekriwal : कर्करोगावर मात करत 32 व्या वर्षी 10 प्रायव्हेट जेटची मालकीण; कनिका टेकरीवाल यांचा प्रवास पहाच

बिझनेसनामा ऑनलाइन | एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी जिद्द दाखवली की ती पूर्ण होतेच. या जिद्दीला खरे उतरलेली महिला म्हणजे कनिका टेकरीवाल (Kanika Tekriwal). आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून आज तब्बल 10 खाजगी जेटची मालकीण बनलेली ही महिला म्हणजेच दिल्लीची कनिका टेकरीवाल. वयाच्या 21व्या वर्षी कर्करोगाचे निदान झालेलं असताना त्यावर मात करून या महिलेने भारतात सर्वात मोठी खाजगी जेट कंपनी स्थापन केली.

बऱ्याच क्षेत्रांकडे हे पुरुषांचा क्षेत्र आहे असं म्हणून बघितला जातं. त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे विमान वाहतूक व्यवसाय. पण या व्यवसायात उतरून कनिका टेकरीवाल यांनी देदीप्यमान यश मिळवले आहे. त्यांच्या कंपनीचं नाव आहे जेट सेट गो. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांना कॅन्सरने ग्रासलं, पण त्यावर मात करत आज वयाच्या 32 व्या वर्षी त्या 10 प्रायव्हेट जेटच्या मालकीण बनल्या आहेत.

कनिका टेकरीवाल चा जन्म भोपाळ मधला असून त्या सध्या दिल्लीमध्ये राहतात. त्यांचे वडील केमिकल आणि रिअल इस्टेट बिझनेस करत होते. कनिका यांनी लॉरेन्स स्कूल लव्हडेल या शाळेतून आपलं सुरूवातीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जवाहरलाल नेहरू वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून पुढील शिक्षण आणि कोव्हेंट्री विद्यापीठातून कनिका टेकरीवाल यांनी एमबीए पूर्ण केलं.

21 व्या वर्षी कॅन्सरचे निदान- (Kanika Tekriwal)

2011 मध्ये कनिका यांना कॅन्सरचा निदान झालं. त्यावेळी त्यांचं वय अवघे 21 होते. परंतु 9 महिने उपचार घेतल्यानंतर त्या ठणठणीत झाल्या. कनिका यांना 16 व्या वर्षापासूनच विमान चालवण्याची फार आवड होती. 22 व्या वर्षी त्यांनी आपलं स्टार्टअप सुरू केलं. त्यांच्या जेट सेट गो (JetSetGo)ला उबर ऑफ द स्काय असं देखील म्हंटल्या जातं. मागील 10 वर्षात त्यांनी जेट सेट गो ला एका उंच शिखरावर नेऊन ठेवलं. जेडसेट गो च्या सीईओ म्हणून आज कनिका टेकरीवाल सर्वत्र ओळखल्या जातात.

10 जेट विमाने, 150 कोटींची उलाढाल-

भारतातील चार्ट प्लॅन क्षेत्राचा कायापालट करण्यामध्ये कनिका टेकरीवालचा प्रचंड मोठा वाटा आहे. आज त्यांच्या जेट सेट गो या कंपनीची उलाढाल एकूण 150 कोटी रुपये एवढी आहे. जेट सेट गो च्या गुंतवणुकीमध्ये सिमेंट उद्योगपती पुनीत दालमिया आणि क्रिकेटर युवराज सिंग हे भागीदार आहेत. कनिका टेकरीवाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक असून आज त्यांची संपत्ती 420 कोटी रुपये एवढी आहे. कनिकाकडे यांच्याकडे सध्या 10 खाजगी जेट असून जेटसेटगो हेलिकॉप्टर, जेट, विमान त्या भाड्याने देतात.

जेट सेट गो सुरु करण्यामागे काय कारण-

कनिका (Kanika Tekriwal) म्हणतात, खाजगी जेड स्पेस मध्ये एग्रीगेटची कमतरता होती. कनिका बऱ्याच लोकांना भेटल्यानंतर त्यांना भारतात खाजगी जेट बुकिंगचा वाईट अनुभव प्रत्येकाकडून मिळाला. त्याचबरोबर बऱ्याच खाजगी जेट मालकांनी वाढत्या किमती, नियमित देखभाल आणि काही समस्यांमुळे विमाने विकून टाकली. त्यावेळी अमेरिकेतील एका सहकाऱ्यासोबत गप्पा मारताना जेट सेटची कल्पना सुचल्याचे कनिका टेकरीवाल यांनी सांगितले.