बिझनेसनामा ऑनलाईन । सरकार कडून जनकल्याणासाठी विविध योजना राबल्या जातात. ज्यात विशेष करून महिला व बालकल्याणाचा विचार असतो. महिलांनी आत्मनिर्भर व्हावं, लहान मुलांना शिक्षण मिळावं म्हणून या योजना सुरु केल्या जातात. उत्तर प्रदेश सरकार द्वारे अश्याच एका योजनेत (Kanya Sumangala Yojana) काही बदल केले आहेत, ज्या अंतर्गत मुलीच्या जन्मांतर तब्बल 5 हजार रुपये देण्यात येतील, तसेच योजनेच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे . आपल्या देशात स्त्रीभृणहत्ये सारखे प्रकार चालतात, अश्या अविचारी कृत्यांना आळा घालण्यासाठी व लोकांमध्ये जागृती निरमाण करण्यासाठी या योजनांची सुरुवात केली जाते.
रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेसाठी मोठी बातमी आणली आहे. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेच्या( Kanya Sumangala Yojana) धनाराशित आता वाढ करण्यात आली आहे. हि रक्कम आधी 15 हजार होती जी वाढवून आत्ता 25 हजार करण्यात आली आहे. यामुळे मुलीना आपलं शिक्षण घेण किंवा करिअर घडवणा सोप जाणार आहे.
नेमकी काय आहे Kanya Sumangala Yojana?
UP Govt Scheme For Girl Child च्या अंतर्गत MukhyaMantri Kanya Sumangala Yojana 2019-20 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश मुलीच्या जन्मापासून ते लग्नापर्यंत तिला आर्थिक मदत देणे असा आहे. एका परिवारातील दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा एकूण बजेट 1200 करोड रुपये आहे. http://mksy.up.govt.in ह्या अधिकृत website वर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.
पुढील वर्षापासून मुलगी जन्माला येताच तिच्या पालकाच्या खात्यात 5,000 रुपये जमा होतील. तसेच मुलगी एक वर्षाची झाल्यावर दोन हजार रुपये व मुलगी सहावीत गेल्या नंतर 3000 रुपये तिला दिले जातील. आठवीत पोहोचताच 5000, दहावीत 7000, तर बारावीत पोहोचताच 8000 रुपयांची मदत सरकारकडून केली जाईल. मुलगी 21 वर्षांची होताच तिच्या लग्नासाठी तब्बल 2 लाख रुपयांची मदत उत्तर प्रदेश सरकार देऊ करतात.
जर का तुम्ही या योजेनेचा लाभ घेण्यासाठी Online नोंदणी करणार असाल तर MSKY च्या Portal ला जावं, किंवा Offline जर का तुम्ही नोंदणी करणार असाल तर Probation Office ला भेट द्यावी.
काय आहेत नियम व अटी ?
एकतर या योजनेचा (Kanya Sumangala Yojana) लाभ केवळ उत्तर प्रदेशातील रहिवाश्यांना मिळेल. एका परिवारातून दोन मुली या योजनेचा भाग बनू शकतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखांपेक्षा जास्ती असू नये. जर का तुम्ही एखादी मुलगी दत्तक घेतलेली असेल तर ती देखील या योजनेचा भाग बनू शकते, तसेच जुळ्या मुलींसाठी वेगवेगळी धनराशी दिली जाईल.
काय कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबईल क्रमांक
- डोमसाईल Certificate
- बँक अकाऊंट डिटेल्स
- Adoption Certificate ( If Required)
- पालकांचे ओळखपत्र
- रहिवासी दाखला