BIG BREAKING : देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीचे निधन

बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील सर्वात वृद्ध अब्जाधीश उद्योगपती केशब महिंद्रा यांचे आज निधन झाले. भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश आणि महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन तसेच आंनद महिंद्रा यांचे काका केशूब यांनी बुधवारी वयाच्या ९९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारतातील 16 टॉप अब्जाधीशांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. केशूब यांच्या मागे $1.2 अब्ज संपत्ती असून त्यांचे कुटुंबीय आहेत. केशूब यांनी महिंद्रा समूहाचे ४८ वर्षे नेतृत्व केल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी अध्यक्षपद सोडले होते. रतन टाटा यांच्यासोबतही केशूब महिंद्रा यांचे मैत्रीचे संबंध होते.

1963 मध्ये महिंद्रा ग्रुपची कमान घेतली हाती

दिवंगत केशुब महिंद्रा यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९२३ रोजी शिमला येथे झाला. 1947 मध्ये त्यांनी वडिलांच्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. यानंतर 1963 मध्ये त्यांना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. केशब महिंद्रा हे उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे काका होते आणि ते आतापर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) चे अध्यक्ष एमेरिटस होते. 2012 मध्ये ग्रुप चेअरमन पदावरून निवृत्त झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांच्याकडे ही जबाबदारी आली.

महिंद्र हे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवीधर होते –

महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांच्या निधनाने कॉर्पोरेट जगतात शोककळा पसरली आहे. शतक झळकावण्यापूर्वीच अब्जाधीशांच्या यादीत पुनरागमन केल्यामुळे ते गेल्या काही दिवसांत चर्चेत होते. त्यांनतर आज काही दिवसांनी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. केशब महिंद्रा यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती. 1963 मध्ये महिंद्रा समूहाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कंपनीला नवीन उंचीवर नेले.

त्यांच्या कार्यकाळात केशब महिंद्रा यांचे लक्ष युटिलिटी वाहनांच्या निर्मितीमध्ये वाढ आणि त्यांची विक्री वाढवण्यावर होते. विलीस-जीपला वेगळी ओळख देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (INSPACE) चे अध्यक्ष पवन गोयंका यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला.

गोयंका यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘औद्योगिक जगताने आज एक मोठे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. केशब महिंद्राची कोणतीच जुळवाजुळव नव्हती, मला जाणून घेण्याचा बहुमान मिळाला. मी नेहमी त्यांना भेटण्यासाठी उत्सुक होतो आणि मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली. ओम शांती’

अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी स्वीकारली –

केशब महिंद्रा यांनी कंपनी कायदा आणि मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती (MRTP) आणि केंद्रीय सल्लागार परिषद यासह विविध सरकारी समित्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 2004 ते 2010 पर्यंत केशूब महिंद्रा पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य होते. वयाच्या ९९ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे ज्येष्ठ उद्योगपती केशब महिंद्रा यांनी टाटा स्टील, टाटा केमिकल्स, आयसीआयसीआय, आयएफसी, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) आणि इंडियन हॉटेल्स या कंपन्यांच्या बोर्ड आणि कौन्सिलवरही काम केले आहे.

कोणकोणत्या पुरस्कारांनी सन्मानित? –

केशब महिंद्रा यांना उद्योगातील अतुलनीय योगदानाबद्दल अर्न्स्ट अँड यंग यांनी 2007 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. यापूर्वी, महिंद्रा समूहाच्या अध्यक्षाच्या भूमिकेत, दिवंगत भारतीय उद्योगपती, ज्यांनी समूहाला मोठ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला होता. केशूब यांना 1987 मध्ये फ्रेंच सरकारने शेवेलियर डी ल’ऑड्रे नॅशनल डे ला लीजन डी’ऑनर पुरस्काराने सन्मानित केले होते.