Khadi Mahotsav Quiz Contest : दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi Jayanti) यांच्या जयंती निमित्त देशभरात 2 ऑक्टोबर पासून खादी महोत्सव साजरा केला जातो. केंद्र सरकारकडून (Central Government) खादी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम 31 ऑक्टोबर पर्यंत राबवला जातो. पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाला ” देश के लिये खादी, फैशन के लिये खादी” असा मंत्रही दिला आहे. गावागावात चालणाऱ्या आपल्या जुन्या परंपरा, हातावर केलेल्या या कारागिरीला देशभरात आणि जगभरात स्थान मिळव म्हणून प्रधानमंत्री मोदींनी याची सुरु केली. याद्वारे आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर लोकल (Vocal for Local) या दोन्ही योजनांना प्रोत्साहन दिलं जातआहे.
तरुणांना आकर्षित करण्यासाठी खादी फेस्ट :
आजकाल खादीचा उपयोग फेशनमध्ये (fashion Trend) केला जात आहेत. खादीपासून आजकाल डेनिम जेकेट, शर्ट, ड्रेस , स्टोल इत्यादी गोष्टी बनवल्या जात आहेत. तरुण पिढीला आवडणाऱ्या आणि त्यांच्याकडून भरपूर वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये यांचा समावेश होतो. यावर्षी खादी योजना तरुण लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून खादी फेस्टच्या (Khadi Festival) जागी सेल्फी पोइंट तयार केले गेले आहेत, ज्यांच्या बाजूलाच मुद्दामून चरखे ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून चारख्यान्सोबत फोटो काढताना तो बाजूला असलेला चरखा देखील लक्ष वेधून घेईल.
या महोत्सवा अंतर्गत ‘खादी महोत्सव क्विज प्रतियोगिता(Khadi Quiz)’ म्हणजेच प्रश्नमंजुषा आयोजित केली जाते. या प्रश्नामंजुषेचा प्रमुख उद्देश सुद्धा तरुण पिढीला आपल्या कपडे विणण्याच्या जुन्या पद्धतीकडे आकर्षित करणे हाच आहे. इथे 300 सेकेंडमध्ये 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात आणि 20 विजेत्यांना 5,000 रुपयांचा इनाम दिला जातो.
हि प्रश्नमंजुषा (Khadi Quiz) झाली Online:
आता हि स्पर्धा सर्वांसाठी Online सुरु करण्यात्त आली आहे. ज्यामध्ये कमीत कमी वेळात अधिकाधिक प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही विजयी बनू शकता. प्रश्नामंजुषेत भाग घेण्यासाठी तुम्ही www.khadiindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपलं नाव नोंदवू शकता. या प्रश्नांची तुम्हाला सोप्या वाटणाऱ्या भाषेत उत्तरं देता येतील(English/Hindi). स्पर्धा सुरु करण्याआधी सर्व नियम व अटी समजून घेणं भाग आहे, कारण दरम्यान झालेल्या चुकीला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल.