Know Your Customer: तुम्ही एकापेक्षा अधिक बँक अकाउंटचा वापर करता का? हो तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आपल्या देशातील सर्वोच्य बँक काही बदल करण्याच्या विचारात आहे, आणि कदाचित आता नवीन आदेशानुसार जर का तुम्ही एकापेक्षा अधिक बँक अकाउंटसाठी एकाच मोबाईल नंबर वापरात असाल तर काही नियमांचे नवीन पालन करावे लागेल.
एकापेक्षा अधिक बँक अकाउंट आहेत का? (Know Your Customer)
तुम्ही बँकमध्ये नवीन खातं उघडताना पहिलं असेल की आपल्याला एक फॉर्म दिला जातो, ज्याला KYC फॉर्म असं म्हणतात आणि या फॉर्मवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर add करावा लागतो. मात्र आता जर का तुम्ही दोन वेगवेगळ्या बँक खात्यांसाठी एकाच मोबाईल नंबर दिला असेल तर सर्वोच्य बँकच्या नवीन नियमांनुसार तुम्हाला काही बदल करावे लागतील. RBI बँक खाते अधिक सुरक्षित करण्यासाठी बँकांसोबत काम करणार आहे. खातेदारांची फसवणूक टाळण्यासाठी आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गुन्हे रोखण्यासाठी बँक काय करणार?
आपल्या देशातील सर्वोच्य बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया KYC नियम आणखीन मजबूत करणार आहे. बँकिंग क्षेत्रातील व्यवस्था मजबूत व्हावी आणि त्यात पारदर्शकता निर्माण होण्यासाठी सर्वोच्य बँक KYC नियमांमध्ये आणखीन एक थर जोडेल. या नवीन योजनेनुसार, ज्या खाताधारकांच्या एकापेक्षा जास्त बँक खाती एकाच फोन नंबरशी जोडलेलीआहेत, त्यांच्या खात्यांची ‘KYC’ (Know Your Customer) अपडेट करण्याची बँकांना सूचना देण्यात येणार आहे.
एकापेक्षा अनेक खाती असलेल्या खातेदारांना आता त्यांच्या KYC फॉर्ममध्ये आणखी एक मोबाईल नंबरची नोंदणी करणे आवश्यक असेल (Know Your Customer). तसेच, ज्यांच्याकडे Joint Bank खाते आहे त्यांनाही KYC फॉर्ममध्ये दुसरा मोबाईल नंबर अपडेट करावा लागेल. कदाचित आता ही प्रक्रिया आणखीन क्लिष्ट होईल, तुम्हाला जास्ती कागदपत्रे द्यावी लागतील.