Kotak Mahindra FD Rates : बँका आपल्या ग्राहकांसाठी नवीन आणि उत्तम योजना घेऊन येत असतात, ज्यांचा फायदा करून घेत त्यांचे ग्राहक आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवू शकतात. गुंतवणूक करण्याची एक उत्तम संधी म्हणजे फिक्सड डेपोझीटमध्ये गुंतवणूक करणे. इथे एकदा गुंतवलेली रक्कम मागे घेता येत नाही आणि ते पैसे मर्यादित काळापर्यंत बँकेजवळ सुरक्षित राहतात. आता कोटक महिंद्रा बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात काही बदल केले आहेत. याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घेऊयात.
कसे आहेत कोटक महिंद्राचे नवीन व्याजदर: Kotak Mahindra FD Rates
खासगी क्षेत्रातील एक महत्वाची बँक म्हणजे कोटक महिंद्रा. या बँकेने फिक्सड डेपोझीटवरील व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता हि बँक सामान्य माणसांसाठी 2.75 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देऊ करत आहे, तर जेष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर वाढून 3.25 टक्के ते 7.75 टक्के झाला आहे. ज्या गुंतवणुका जास्ती मोठ्या कालावधीसाठी केल्या जातात त्यांचेही व्याजदर आता वाढवले आहेत. त्यामुळे दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी बँक सामान्य माणसांना 7.10 टक्क्यांचा व्याजदर देऊ करत आहे. (Kotak Mahindra FD Rate)
तसेच एक वर्ष किंवा दोन वर्षांच्या गुंतवणुकीवर बँक 7.25 टक्के व्याजदर देत आहे. जर का तुम्ही सात दिवस किंवा दहा वर्षांसाठी RD वर गुंतवणूक करणार असाल तर 6 ते 7.20 टक्के व्याजदर लागू होईल, हाच व्याजदर जेष्ठ नागरिकांसाठी 6.50 टक्के ते 7.70 टक्क्यांपर्यंत आहे. मात्र बँकेच्या म्हणण्यानुसार तुम्ही जर का एका महिन्यासाठी गुंतवणूक केलीत तर कोणतेही व्याज देऊ केले जाणार नाही फक्त गुंतवणुकीची मूळ रक्कम तेवढी परत केली जाईल.