Kumar Mangalam Birla: आपल्या देशात आत्ताच्या घडीला सर्वाधिक चर्चेचा विषय कोणता आहे? अर्थसंकल्प!! म्हणजेच येणारं बजेट. अगदी काही दिवसांचीच वैध असलं तरी या बजेटची चर्चा मात्र नेहमी प्रमाणे जोरदारच सुरु आहे. सामान्य लोकांपासून ते थेट मोठमोठाल्या व्यवसायिकांपर्यंत सार्वजणं येणाऱ्या बजेटमधून काय नवीन गोष्टी बाहेर येतील याची शक्यता मांडत आहेत आणि अश्यातच आदित्य बिर्ला कंपनीचे मालक कुमार मंगलम बिर्ला यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल स्वतःचे मत व्यक्त केले आहे. चला मग आज पाहुयात आपली अर्थव्यवस्था आणि बजेट यांबद्दल काय म्हणतायत बिर्ला..
बिर्ला अर्थव्यवस्थेवर खुश? (Kumar Mangalam Birla)
आपल्या सकारात्मक अर्थव्यवस्थेचं कौतुक सगळेच करतात, आणि आता कुमार मंगलम बिर्ला यांचं नाव देखील यांमध्ये सामील करावं लागेल. अलीकडेच बिर्ला यांनी सोशल मीडियावर “Just Looking Like a Wow” हे नेटकऱ्यांचं वाक्य वापरात देशाच्या अर्थव्यवस्थेचं कौतुक केलं आहे. ते म्हणतात की आपली अर्थव्यवस्था गौरवशाली आहे, प्रगतीच्या मार्गावर आहे आणि कदाचित म्हणूनच आपण आता National Confidence Index चा विचार केला पाहिजे. सोशल मीडियावर त्यांनी केलेली पोस्ट पहिली तर तुमच्या लक्ष्यात येईल की बिर्ला कंपनीचे मालक आपल्या आर्थिक स्थितीवर किती खुश आहेत.
ते म्हणतात की देशातील प्रत्येकाच्या मनात सध्या आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला पाहायला मिळतोय, याचाच अर्थ असा की आपल्या आजूबाजूला प्रत्येकाला स्वतःच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास बसला आहे, केवळ इतर देशाचं नाही तर भारत देखील उत्तम प्रगती करून दाखवू शकतो यासाठी महत्वाची गोष्ट आपल्याला सापडली आहे, कारण मनात विश्वास नसेल तर माणूस काहीही करू शकत नाही, कुठल्याही कठीण परिस्थितीचा सामना करू शकत नाही. मग अंगात बळ असून देखील त्या माणसाला स्वतःच्या कार्यक्षमतेबद्दल विश्वास वाटत नाही. पण आता भारत बदलत आहे, भारताच्या प्रत्येक जनसामान्यच्या मनात आत्मविश्वास जागृत होतोय, म्हणूनच नक्कीच येणाऱ्या काळात आपल्या प्रगतीचे मार्ग खुले झालेत. कुमार मंगलम बिर्ला यांनी Nation on the Move असं म्हणत परिवर्तनकारी देश भारताचं संबोधन केलं आहे.
भारताची अर्थव्यवस्था मजबूत होतेय का?
जसं की आपण सगळेच जाणतो आत्ताच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत असून, येणाऱ्या काळात यात आणखीन सकारात्मक बदल घडणार आहेत. केवळ देशातील तज्ञच नाही तर विदेशातील अनेक लोकं आपल्या अर्थव्यवस्थेचे कौतुक करीत आहेत. आज केवळ कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांनीच नाही तर देशाच्या अर्थ मंत्रालयाने देखील सकारात्मक भारताच्या वाटचालीबद्दल विश्वास प्रकट केला आहे. येणाऱ्या तीन वर्षांत आपण 5 ट्रिलियन डॉलरचा आकडा गाठणार असून जगभरातील तिसरे स्थान काबीज करणार आहोत, आणि येत्या सहा वर्षांत हा आकडा 7 ट्रिलियन पर्यंत देखील पोहोचण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.