Lakshadweep Opportunities : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या काही दिवसांमध्ये लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीनंतर मालदीव मधल्या काही मंत्र्यांनी त्यांच्यावर टिप्पण्या केल्या ज्यामुळे भारतीय संतापले आणि त्यांनी सोशल मीडियाचा वापर करत मालदीविरुद्ध एक अभियान सुरू केलं. या अभियानात त्यांनी Boycott Maldives असं म्हणत मालदीवला न जाण्याचा सल्ला दिला. खास बाब म्हणजे या अभियानात त्यांना देशातील ट्रॅव्हल अँड टुरिझम कंपन्यांनी देखील सहकार्य दाखवले, आणि परिणामी पर्यटनावरच अधिकाधिक अवलंबून असलेल्या मालदीवला आर्थिक नुकसानीच्या सामना करावा लागला. नेटकऱ्यांनी चलो लक्षद्वीप असे म्हणत मालदीव विरोधात पुढील शस्त्र उगारले व परिणामी लक्षद्वीपला जाणाऱ्या पर्यटकांचे संख्या वाढत आहे. याच वाढणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात म्हणून सरकारने लक्षद्वीप मध्ये नवीन विमानतळ उभारण्याची योजना आखली आहे. मात्र लक्षद्वीपच्या वाढत्या आकर्षणामुळे केवळ पर्यटनक्षेत्रच नाही तर बाकी अनेक क्षेत्रांना भरपूर नफा कमवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ही विविध क्षेत्रं कोणती हे आज जाणून घेऊया…
लक्षद्वीपवर “या” क्षेत्रांसाठी येणार अच्छे दिन: (Lakshadweep Opportunities)
मालदीवचा मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पणीमुळे मालदीव आणि भारत यांच्यात वादविवाद सुरू झालेत. मात्र यामुळेच लक्षद्वीप हा चर्चेचा विषय बनला असून या केंद्रशासित प्रदेशाबद्दल अनेकांना आकर्षण वाटत आहे. लक्षद्वीपचे नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेता पर्यटन हा तर तिथला केंद्रबिंदू ठरतो. मात्र येणाऱ्या पर्यटकांचे व्यवस्थित आदरातिथ्य व्हावे म्हणून नवनवीन इको फ्रेंडली रिसॉर्ट्स तयार केले जात आहेत. तसेच टूर पॅकेज आणि वॉटर स्पोर्ट्स यांना देखील अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे.
मात्र केवळ पर्यटन आणि हॉस्पिटलिटीच नाही तर लक्षद्वीपवरील कृषी क्षेत्राला वाढत्या पर्यटकांमुळे आर्थिक फायदा मिळणार आहे. या छोट्याशा बेटावर चालणाऱ्या हस्तकला व्यवसाय आणि संस्कृतीक कार्यक्रमात लक्षद्वीपच्या समृद्धीचा वारसा जपलेला असतो. ही मंडळी आलेल्या पर्यटकांना इथल्या सांस्कृतिक कलाकाराची झलक दाखवतात. त्यामुळे विविध भागातून येणारे पर्यटक स्थानिक कारागिरांना देखील प्रोत्साहन देतात (Lakshadweep Opportunities). लक्षद्वीपसाठी वाढती मागणी पाहता स्थानिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आणि शैक्षणिक पर्यटन उपक्रम कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
बेट म्हटलं की चारी बाजूंनी या जमिनीला समुद्राने वेढलेलं असतं. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना Sea Food ची नक्कीच इच्छा होईल. हीच इच्छा जाणून स्थानिक सागर संसाधनांनी Sea Food ची निर्यात आणि मत्स्य पालन प्रकल्प यावर लक्ष केंद्रित केले असून इथूनही भरपूर पैसा कमावला जाणार आहे. इथे उपलब्ध असलेले आयुर्वेदिक आणि वेलनेस सेंटर हे देखील त्यांच्या पारंपारिक उपचारांसह पर्यटकांना विश्रांती घेण्याची संधी उपलब्ध करून देतील आणि सगळ्यात शेवटी पर्यटकांसाठी सर्वात गरजेची गोष्ट असते ती म्हणजे वाहतूक सेवा. त्यामुळे लक्षद्वीप येथे सुधारलेली आंतरबेट वाहतूक आणि पर्यटन अनुकूल सेवा पर्यटकांचा प्रवास सुलभ करणार आहे.