Lava Blaze 2 5G : बाजारात आलाय नवीन 5G फोन; किंमत फक्त 10 हजार रुपये

Lava Blaze 2 5G : आता दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सणासुदीच्या या काळात अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी आपल्या वस्तूंवर भरगोस सूट देत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवा मोबाईल घेण्याचा विचहर करत असाल तर Lava कंपनीने तुमच्यासाठी स्वस्तात मस्त असा 5G मोबाईल आणला आहे. Lava Blaze 2 5G असे या मोबाईलचे नाव असून आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स पाहूया.

फीचर्स – Lava Blaze 2 5G

Lava Blaze 2 5G मध्ये 6.56 इंच चा HD + IPS 2.5D CURVED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट सह येतो. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6020 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर काम करतो. कंपनीने मोबाईल मध्ये 5000 mAh क हि दमदार बॅटरी दिली असून ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा हँडसेट रिंग लाईटवाल्या कॅमेरा मॉड्युलसह येतो, ज्याची लाईट तुम्ही गरजेनुसार सेट करू शकता. तसेच या मोबाईलमध्ये अँड्रॉइडहे सगळे फीचर्स उपलब्ध असतील.

किंमत –

कंपनीकडून बाजारात आणलेला मोबाईल हा दोन प्रकारांमध्ये येतो, पहिला 4GB RAM + 64GB असलेला मोबाईल स्टोरेज मॉडेल, ज्याची किंमत 9,999 रुपये एवढी आहे. तर, 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. हा मोबाईल दोन वेगळ्या कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध होईल. आणि याची खरेदी तुम्ही ऑनलाईन साईटस जसे कि अमेझोन वर करू शकता. या कंपनीचा लवकरच सेल सुरु होणार आहे आणि खास बाब म्हणजे मोबाईलमध्ये काहीही तांत्रिक अडचण असल्यास कंपनीतर्फे तुम्हाला घरी येऊन सर्व्हीस देण्यात येतील.