Layoff 2023 : कंपनीने कामावरून काढून टाकल्यावर काय करावं? पहा Microsoft चे माजी HR काय म्हणतात

Layoff 2023: या आर्थिक वर्षात अनेक दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कायमचा नारळ दिला आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कायमचे कमी करण्यात आले. आणि या कंपन्यांमध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, स्पोटिफाय, लिंक्डइन इत्यादी प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश झाला आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना बाहेरचा रास्ता दाखवला गेल्यानंतर Microsoft चे माजी HR व्हीपी ख्रिस विलियम्स यांनी बाहेर पडलेल्या कर्मचायांनी नेमकं काय करावं यावर महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. काय म्हणतात मायक्रोसॉफ्टचे माजी HR जाणून घेऊया..

हे आर्थिक वर्ष होतं धोक्याची घंटा:

2023 हे वर्ष तंत्रज्ञान विभागासाठी फारच कष्टकरी ठरले आहे, कारण या वर्षात अनेक मंडळींना कंपन्यांकडून बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला होता. आणि या कंपन्या काही अश्या तश्या नसून जगभरातील प्रतिष्ठित कंपन्या आहेत. वरती नमूद केल्याप्रमाणे गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी या ना त्या कारणाने कर्मचाऱ्यांना बाहेरचा रास्ता दाखवला होता (Layoff 2023). हे कर्मचारी म्हणता कि त्यांना काहीही न कळवता सरळ कामावरून हटवण्यात आले. तर काही लोकं सांगतात कि आधल्या दिवशी त्यांना कामावरून काढून टाकण्याचा संदेश ई-मेलद्वारे देण्यात आला होता. त्यामुळे एकंदरीतच कर्मचारी वर्ग गाफील असताना त्यांच्या हातातून काम निसटून गेले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Layoff 2023 वर काय म्हणाले Microsoft चे माजी HR:

Microsoft हि जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे माजी HR VP ख्रिस विलियम्स यांनी एका लेखात कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनी काय करावं यावर थोडा प्रकाश टाकला आहे. सुरुवातीला कंपन्यांकडून घेतलेल्या या निर्णयाचा त्यांनाही धक्का बसल्याचं त्यांनी कबुल केलं आहे. त्यानंतर महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत त्यांनी कर्मचाऱ्यांना सर्वात आधी पेपर वर्क पूर्ण करून घेण्याचा सल्ला दिला आहे. अचानक जॉब गेल्यामुळे कर्मचारी बिथरून जाणे स्वाभाविक आहे पण म्हणून पेपर वर्क पूर्ण झाला नाही तर मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही कागदपत्रावर शेवटची सही करताना ते नीट वाचून मगच त्यावर स्वाक्षरी करावी असं त्यांचं ठाम म्हणणं आहे. (Layoff 2023).

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःसाठी कोणत्या फायद्याच्या गोष्टी आहे का यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कंपनीकडून अधिकवेळा गरोदर महिला किंवा प्रोटेक्टेड क्लासमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही सवलती देऊ केल्या जातात. अश्या सवलतींमध्ये जर का तुमच्या समावेश होत असेल तर अवश्य याचा फायदा करून घ्या असं ते म्हणाले. तुमच्याजवळ कंपनीला हव्या असलेल्या कला असतील तर हीच कंपनी तुम्हाला पुन्हा कामावर रुजू करून घेऊ शकते असे त्यांनी आपल्या लेखात लिहिले आहे (Layoff 2023). आणि सर्वात शेवटी विलियम्स यांनी कंपनीमधून काढून टाकलेल्या अधिकाऱ्यांना घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती लिंक्डइन द्वारे लोकांपर्यंत पोहोचवावी अशी टीप दिलीये. ज्या कर्मचाऱ्यांना अजून या लेऑफचा फटका बसलेला नाही त्यांनीही सांभाळून राहावं अन आपलं नेटवर्क होईल तेवढं मजबूत करावं असा संदेश दिला आहे.