Layoffs In India : यंदा भारतात 100 पेक्षा अधिक कंपन्यांनी 15 हजार कर्मचाऱ्यांना दिलाय नारळ!!

Layoffs In India : जगभरात भारत देश हा विविध प्रकारचे व्यवसाय आणि स्टार्टअप्स साठी ओळखला जातो. देशातील तरुण पिढी आजकाल जास्तीत जास्त भर स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यावर देत आहे. कदाचित त्यांना इतरांच्या हाताखाली काम करायचं नाही किंवा नोकरीच्या क्षेत्रात जाणवणारी टंचाई पाहून ते नोकरी ऐवजी व्यवसाय करणेच स्वीकारतात. याच कारणामुळे भारताला जगभरात स्टार्टअप केंद्र म्हणून ओळखलं जातंय. मात्र तुम्हाला माहिती आहे का काही आर्थिक अडचणींमुळे आपल्या देशातील 100 पेक्षा अधिक स्टार्टअप कंपन्यांनी 15 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. नेमकं काय आहे यामागील कारण ते जाणून घेऊया…

भारतात कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या : (Layoffs In India)

जगातील एक महत्वाचे स्टार्टअप केंद्र म्हणून भारताने ओळख मिळवली आहे. याचे प्रमुख ,कारण म्हणजे आपल्या देशातील तरुण खास करून व्यवसाय करण्याकडे वळत वळत आहेत. मात्र विचार करण्याची बाब म्हणजे यंदा आपल्या देशात आर्थिक अडचणींमुळे 100 पेक्षा अधिक कंपन्यांनी 15 हजार पेक्षा जास्ती कर्मचाऱ्यांना बाहेरचा रास्ता दाखवला आहे. यामध्ये सर्वात आधी समावेश होतो तो म्हणजे Byjus या कंपनीचा. हि कंपनी वेगवेगळ्या टप्प्यांवर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्या देण्याचं काम करते. रोख भांडवलाची टंचाई निर्माण झाल्यामुळे कंपनीने यंदाच्या वर्षीच्या दुसऱ्या फेरीत जवळपास अडीज हजार कर्मचाऱ्यांच्या आकडयांमध्ये कपात केली आहे.

मात्र लक्ष्यात घ्या कि कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बाहेरचा रास्ता दाखवण्यामध्ये केवळ Byjus हि एकमेव कंपनी सामावलेली नाही, तर विविध क्षेत्रांमधल्या अनेक कंपन्या जसे कि Ola, Sharechat, Denzo, Misho आणि देशभरात प्रसिद्ध असलेल्या swiggy चाही समावेश झाला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या काळात भारतात स्टार्टअप्सना मिळालेल्या निधीमध्ये 65.8 टक्क्यांची घसरण झाली आहे. भारताची युनिकॉर्न स्टार्ट अप्सची संख्या देखील बऱ्याच मोठ्या टक्क्यांनी कमी झाली होती, वर्ष 2022 मध्ये आपल्याजवळ 24 युनिकॉर्न कंपन्या होत्या ज्यांच्या जागी आज केवळ 2 कंपन्या शिल्लक राहिल्या आहेत (Layoff in India).

जागतिक स्तरावर देखील होतेय कर्मचाऱ्यांची कपात:

केवळ भारताचं नाही तर जगभरातील विविध क्षेत्रांमधले कर्मचारी आपल्या नोकऱ्या गमावत आहेत. यांमध्ये काही नवख्या किंवा अपरिचित कंपन्यांचा सहभाग झालेला नव्हता तर Spotify, Micros, Google अश्या दिग्गज कंपन्यांचाही समावेश झाला होता. जगभरात महागाईचे वारे वाहत असताना कंपन्यांनी घेतलेला हा निर्णय अनेकांना पटलेला नव्हता. कदाचित तुम्ही थक्क व्हाल पण समोर आलेल्या आकड्यांप्रमाणे जागतिक स्तरावर यावर्षी 1160 पेक्षाही अधिक कंपन्यांनी 26 लाख, किंबहुना त्याही पेक्षा अधिक लोकांना कंपनीतून काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांची मोठी कपात का? यावर उत्तर देताना कंपन्या सांगतात कि त्यांच्याजवळ असलेल्या फ़ंड नुसार ते कामाची धुरा सांभाळू शकत नाहीत, त्यांना पैश्यांची चणचण जाणवत आहे आणि परिणामी कंपन्यांनी कर्मचारी वर्गाला बाहेरचा रस्ता (Layoff in India) दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.