Flipkart चे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांच्याविषयी जाणून घ्या

बिझनेसनामा । भारतीय अब्जाधीश उद्योजक असलेल्या बिन्नी बन्सल यांचा जन्म 1983 मध्ये चंदीगड, पंजाब, हरियाणा येथे झाला. त्यांच्या वडीलांनी सैन्यामध्ये राहून देशसेवा केली आहे. रिटायरमेंटनंतर त्यांचे वडील बँकेत कर्मचारी मुख्य व्यवस्थापक आहेत. तसेच त्यांची आई सरकारी कर्मचारी आहे. बिन्नी यांना कोणीही भाऊ आणि बहीण नाही. बिन्नी यांनी चंदीगडमधील St. Anne’s शाळेमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. सध्या बन्सल बंगळुरूमध्ये आपली पत्नी त्रिशासोबत राहतात.

यानंतर त्यांनी आयआयटी दिल्ली मधून कॉम्प्युटर सायन्स विषयातील बीटेक पदवी मिळविली. विशेष म्हणजे स्नॅपडीलचे सहसंस्थापक असलेले रोहित बन्सल हे यावेळी त्यांचे बॅचमेट होते. बीटेकची पदवी मिळवल्यानंतर बन्सल यांनी सरनॉफ कॉर्प या रिसर्च अँड डेव्हलपमेंट कंपनीमध्ये काही काळ काम केले.

याची माहिती फार कमी लोकांना माहित असेल कि, सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेलय बिन्नी याना Flipkart चे सह-संस्थापक होण्याआधी Google कडून दोन वेळा नाकारण्यात आले होते. बिन्नी यांनी Amazon या ऑनलाइन कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नऊ महिने काम केले आहे. Amazon मध्ये जाण्यापूर्वी बन्सल यांनी सरनॉफ कॉर्पोरेशनमध्येही काम केले होते जेथे त्यांनी कारसाठी लेन सेन्सर डिव्हाइस डेव्हलप केले.

2007 मध्ये बिन्नी यांचा संबंध त्यांचे मित्र सचिन बन्सल यांच्याशी आला. यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की, भारतातील ई-कॉमर्स मार्केट खूपच लहान आहे. इथे आपल्याला चांगली संधी मिळू शकेल. मग 2007 मध्ये Amazon सोडल्यानंतर त्यांनी ऑनलाइन बुक स्टोअर सुरू करण्याची योजना आखली. ज्यानंतर त्यांनी ई-कॉमर्स कंपनी म्हणून कोरमंगला येथे दोन मजली इमारतीत Flipkart ची स्थापना केली. अशा तऱ्हेने Flipkart ही भारतातील पहिली ई-कॉमर्स कंपनी म्हणून उदयास आली.

Flipkart ची स्थापना करण्यापूर्वी या दोघांनी Amazon या अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनीमध्येही काही काळ काम केले होते. सुरुवातीला सर्वानाच बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल हे दोघे भाऊ असल्याचे वाटत असे. सुरुवातीच्या काळात हे दोघेही आपपल्या स्कूटरवरूनच पुस्तके वाटायचे. यानंतर Flipkart ने हळूहळू इलेक्ट्रिकल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, क्रीडा, गृहोपयोगी उपकरणे, पुस्तके यांसारख्या अनेक उत्पादनांचा समावेश केला.

2016 मध्ये बिन्नी बन्सल हे Flipkart चे CEO बनले. यावेळी त्यांनी जिथे त्यांनी कंपनीची दिशा, धोरणात्मक विकास आणि व्यवसाय व्यवस्थापन यावर जास्त काम केले. वॉलमार्टने 2018 मध्ये फ्लिपकार्ट ग्रुपमधील 77% भागभांडवल विकत घेतले. संपादनानंतर, बिन्नी बन्सल ग्रुप सीईओ म्हणून पुढे राहिले. मात्र पुढे जाऊन नोव्हेंबर 2018 मध्ये, बिन्नी बन्सल यांना वैयक्तिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे फ्लिपकार्टमधून राजीनामा द्यावा लागला.