Legal Action Against Zee : Zee Entertainmentने ऑगस्ट महिन्यात दिलेल्या माहितीनुसार त्यांनी Disney Star सोबत एक करार केला होता. Zee Entertainment आणि Disney Star यांनी हातमिळवणी केल्यामुळे पुढच्या चार वर्षांपर्यंत सर्व ICC स्पर्धा, मग त्या मोठ्यांसाठी असो की तरुणांसाठी या सर्व Zee च्या टेलिव्हिजनवर थेट पाहता येणार होत्या. खास करून यात T20 World Cup, Champions Trophy आणि Cricket World Cup सारख्या मोठ्या स्पर्धांचाही समावेश झाला होता. मात्र आता हा करार देखील फिस्कटला आहे, आणि एवढंच नाही तर परिणामी आता Disney ने Zee विरोधात तक्रार देखील दाखल करू शकते.
Zee समोर आणखीन मोठं संकट उभं राहणार का? (Legal Action Against Zee)
अलीकडेच Zee आणि Sony यांच्यामधला एक महत्वाचा करार फिस्कटला होता, आणि याचा गंभीर परिणाम झी कंपनीला भोगावा लागणार आहे अश्या चर्चा केल्या जात होत्या. हे प्रकरण अजूनही ताजं असतानाच आता Zee कंपनी समोर आणखीन एक मोठं संकट येऊन उभं ठाकलंय. Disney Star आणि Zee Entertainment यांच्यात क्रिकेटच्या प्रसारण हक्कांवरून मोठं वादळ उठलंय आणि तब्बल 1400 कोटींचा करार Zee ने टाकल्याचं वृत्त असून, Disney त्यांना कोर्टात खेचू शकते. Disney Star आणि Zee यांच्यात झालेल्या कराराच्या अटींनुसार आता Disney मध्यस्थीचा मार्ग निवणार की कोर्टातून न्याय मागणार हे पाहावं लागेल.
दोघांमध्ये नेमका काय करार झाला होता?
ऑगस्ट 30, 2023 रोजी समोर आलेली माहितीनुसार Disney आणि Zee यांच्यात एक महत्वाचा करार झाला होता, आणि या करारांतर्गत ZEE ला पुढील चार वर्षांसाठी ICC Men’s आणि Under-19 क्रिकेट स्पर्धा प्रसारित करण्याचे हक्क मिळाले होते. याचा अर्थ 2024 ते 2027 पर्यंत सर्व ICC सामने भारतात Zee च्या वाहिन्यांवर दाखवले जाणार होते आणि या सगळ्यात 2024 आणि 2026 चे T20 विश्वचषक, 2025 ची Champions Trophy आणि 2027 चा विश्वचषक हे सामने प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले असते.