LIC Aadhaar Shila : महिलांनो, 87 रुपयांच्या गुंतवणूकीतुन जमा करा 11 लाखांचा फंड

LIC Aadhaar Shila | भारतीय जीवन वीमा निगम द्वारे LIC आधार शीला योजनेची (LIC Aadhaar Shila) सुरुवात करण्यात आली आहे . या आधी सुद्धा LIC द्वारे अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत. ह्यात जीवन विमा ते स्वास्थ्य विमाचा समावेश आहे. आजच्या या लेखात आपण LIC आधार शीला योजनेचा फायदा कसा होतो हे जाणून घेणार आहोत. खास महिलांसाठी असलेल्या या योजनेत दररोज 87 रुपयांची गुंतवणूक करून महिला तब्बल 11 लाख रुपयांचा फंड जमा करू शकतात. त्यामुळे ही योजना नेमकी कशी काम करते? आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी की की कागदपत्रे आणि पात्रता लागते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

काय आहे आधार शीला योजना (LIC Aadhaar Shila)

आधार शीला योजना ही एक non-linked participatory endowment plan आहे. याची सुरुवात कठीण काळात आपली बचत वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. इथे महिन्यासाठी , तीन महिन्यासाठी, सहा महिन्यांसाठी किवां वर्षभरासाठी गुंतवणूक करावी लागते. Policy चा कालावधी संपल्यानंतर एखादी ठराविक रक्कम तुमच्या Bank Account मध्ये समाविष्ट केली जाते. ज्या महिला ८ ते ५५ वर्षांच्या मर्यादेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे.

आधार शीला योजनेचे नियम व अटी

1) आधार शीला योजनेमध्ये (LIC Aadhaar Shila) गुंतवणूक करण्यासाठी महिलांची वयोमर्यादा ८ ते ५५ असावी.

2) ही Policy तुम्ही १० ते २० वर्षांसाठी करू शकता. Policy धारकाचे वय Maturity च्या वेळी ७० पेक्षा जास्ती असू नये .

3) सोबतच इथे गुंतवणूक करण्यसाठी तुमच्याजवळ आधार कार्ड असंण गरजेचं आहे.

4) Policy करणाऱ्या व्यक्तीचा जर का मृत्यू झाला तर तिच्या परिवाराला या योजनेचा फायदा मिळतो.

5) या योजनेचा भाग बनण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरोग्य तापसणी करण्याची गरज नाही.

6) LIC च्या या योजनेत मिळणारी रक्कम कमीत कमी ७५००० तर जास्तीत जास्त ३००००० अशी आहे.

आधार शीला योजनेचा उद्देश काय आहे?

ह्या योजनेचा मुल उद्देश देशातील महिलांना अर्धिक सुरक्षा देणे हा आहे. इथे policy धारकांना गरजेनुसार loan देण्याची व्यवस्था केली गेली आहे. या policy च्या काळात जर का तुम्ही वेळोवेळी पैसे भरले असतील तर तुम्हाला loyalty edition दिलं जातं .

आधार शीला योजनेचे फायदे कोणते?

Policy धारकाला जर का Policy रद्ध करायची असेल तर पंधरा दिवसांच्या आत ती रद्ध केली जाऊन शकते. यावेळी जमा केलेले प्रीमियम तुम्हाला परत केले जातात. तीन वर्षांसाठी policy मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला Loan ची सेव देण्यात येते. जर का Policy धारकाचा policy विकत घेतल्यानंतर पाच वर्षानी मृत्यू झाला तर मागे राहिलेल्या परिवाराला death benefit देण्यात येतं.

आधार शीला योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवशक आहेत?

१) आधार कार्ड
२) वोटर आयडी कार्ड
३) पासपोर्ट साईझ फोटो
४) ड्राईविंग लाय्संस
५) रेशन कार्ड
६) पासपोर्ट
७) इन्कम टेक्स रिटर्न
८) सेलरी स्लीप
९) इलेक्ट्रिसिटी बिल
१०) हेअल्थ रीकॉर्ड

11 लाख रुपये कसे मिळवायचे

जर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला आधार शिला पॉलिसीद्वारे 11 लाख रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला दररोज 87 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या अंतर्गत दर वर्षाला 31,755 रुपये प्रीमियम आकारला जाईल. या पॉलिसी मध्ये सलग 10 वर्षांची गुंतवणूक केल्यास एकूण ठेव रक्कम 3,17,550 रुपये होईल एलआयसी आधार शिला योजनेचा मॅच्युरिटीचा कालावधी 70 वर्षे आहे त्यामुळे तुम्ही वयाच्या 70 व्या वर्षी पैसे काढले तर तुम्हाला 11 लाख रूपये मिळतील.