LIC ची जबरदस्त योजना; 833 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा 1 कोटी रुपये

बिझनेसनामा ऑनलाईन । सध्याची वाढती महागाई पाहता भविष्यातील गरजा भागवण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्याकडे अनेकांचं लक्ष्य असत. योग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक करून उतार वयात त्या पैशाचा वापर करणे आणि पुढच्या पिढीसाठी आर्थिक योगदान देणे यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या योजनांचा मार्ग अवलंबतो. आजही आम्ही तुम्हाला अशा एका योजेबाबत सांगणार आहोत ज्याद्वारे महिन्याला 833 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांनी 1 कोटी रुपये मिळवू शकता.

होय, हि योजना आहे भारतीय जीवन विमा म्हणजेच LIC ची मनी लाइन पॉलिसी .. तुम्हाला तर माहीतच आहे की , LIC ही सर्वात मोठी सरकारी मालकीची जीवन विमा कंपनी आहे. ग्राहकांना वेगवेगळ्या स्कीमचा लाभ मिळावा यासाठी LIC अनेक पॉलिसी आणत असते. आज आम्ही तुम्हाला ज्या LIC मनी लाइन पॉलिसी बद्दल सांगणार आहोत ती एक मनी-बॅक योजना आहे. यामध्ये पॉलिसीधारकांना आवर्ती रक्कम देण्यात येते. या पॉलिसीच्या मुदतीदरम्यान, पॉलिसीधारक जिवंत असताना पूर्व-निर्धारित अंतराने नियतकालिक पेमेंट देखील केले जाऊ शकते. आणि पॉलिसीधारकाला मॅच्युरिटीवर हमी एकरकमी पेमेंट दिली जाऊ शकते. हे क्रेडिट सुविधांद्वारे समस्येचे निराकरण करते.

एलआयसी मनी लाइन पॉलिसीसाठी पात्रता काय आहे?

एलआयसी मनी लाइन पॉलिसीसाठी पॉलिसी धारकाचे वय हे 26 वर्षे हवे असुन मूळ विमा रक्कम ही 10 लाख रूपये, पॉलिसी टर्म 20 वर्षे आणि प्रीमियम भरण्याची मुदत 10 वर्षे असते. सहाव्या वर्षापासून अतिरिक्त हमी ही 50 रूपये प्रति 1000 रूपये विम्याची रक्कम एवढी असते.

समजा, जर तुम्ही वयाच्या 30व्या वर्षी या पॉलिसी मध्ये गुंतवणूक करत असाल तर विमा रकमेसाठी वार्षिक 9996 रुपये म्हणजेच दर महिन्याला ८३३ रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. यासोबतच, तुम्ही अॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडरची निवड करता त्यावेळी दुर्दैवाने, वयाच्या 40 व्या वर्षी तुमचा अपघात झाल्यास, योजनेअंतर्गत तुमच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची विमा रक्कम मिळेल. तसेच कुटुंबाला 50 लाख रुपयांचा अपघाती मृत्यू लाभ देखील मिळेल.