LIC Insurance : माणसाच्या मुलभूत गरजा कोणत्या असं म्हटलं तर आपण साहजिकपणे अन्न, वस्त्र आणि निवारा असंच उत्तर देऊ. मात्र आता यात अजून एक घटक जोडावा लागेल, ज्याशिवाय जगणं आत्ताच्या जगात तरी शक्य नाही आणि तो म्हणजे पैसा. सामान्य माणूस मुबलक पैश्याशिवाय या महागाईत टिकाव धरून राहू शकत नाही, उदाहरणार्थ आजचा निवारा झाला म्हणजे निश्चित झोप लागेल का ? नाही !! आज कसा-बसा दिवस गेला पण उद्याचं काय असं प्रश्न प्रत्येकालाच सतावत असतो. म्हणून केली जाते ती गुंतवणूक, आता गुंतवणूक म्हणजे काय? तर भविष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी पैश्यांची केलेली तजवीज. गुंतवणूक हि कुठेही केली जाऊ शकते, काही लोकं यासाठी बँकची निवड करतात तर काही पोस्ट ऑफिसला सुरक्षित मानतात. मात्र कित्येक लोकं आर्थिक संस्थांची मदत घेताना दिसतात, यामध्ये सर्वात चर्चित असलेलं नाव आहे ते म्हणजे LIC आणि आता हि कंपनी जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी बनली आहे.
LIC Insurance बनली देशातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी:
भारतीय आयुर्विमा कंपनी म्हणजेच LIC. देशात अनेक लोकं विमा सुरक्षा मिळवण्यासाठी अधिकांश वेळा LIC ची निवड करतात. मागच्या अनेक वर्षांपासून बाजारात असलेली हि कंपनी कित्येक ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरली. आणि आता S&P ग्लोबल मार्केट इंटेलीजन्सच्या क्रमवारीत हि कंपनी जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी बनली आहे (LIC Insurance). जगभरातील कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर सरकारी विमा कंपन्यांच्या तुलनेत Allianz SE, चायना लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि निप्पोन लाईफ इन्शुरन्स कंपनी याच अग्रेसर आहेत. आपल्या देशासाठी आनंदाची बातमी म्हणजे जगभरातील या 50 विमा कंपन्यांमध्ये LIC हि एकच भारतीय कंपनी आहे.
LIC चा रोख साठा किती?
ग्लोबल मार्केट इंटेलीजन्सच्या यादीत चौथ्या स्थानावर असलेल्या आपल्या LIC कंपनीचा रोख साठा 503.7 अब्ज डॉलर्स आहे (LIC Insurance). मात्र Allianz SE कंपनीचा रोख साठा 750.20 अब्ज डॉलर्स, चायना लाईफ इन्शुरन्स कंपनीचा रोख साठा 616.90 आणि निप्पोन लाईफ इन्शुरन्स यांचा रोख साठा 536.80 असल्यामुळे ते आपल्या तुलनेत कैक मैल पुढे आहेत. जगभरातील या 50 विमा कंपन्यांमध्ये 21 युरोपियन कंपन्या आहेत, त्यामुळे सध्यातरी विम्याच्या जगात युरोपचे राज्य आहे असे म्हणावे लागेल. मात्र अमेरिकेत जीवन विमा कंपन्यांचे प्रमाण अधिक आहे आणि म्हणूनच अमेरिका या यादीत 12 व्या स्थानावर पाहायला मिळते. अमेरिकेत एकूण 8 विमा कंपन्या असून 7 विमा कंपन्यांसह युरोप त्यांच्या मागोमाग आहे. आशियातील विमा कंपन्यांचा विचार केला तर तर चीन आणि जपान सर्वात अव्वल स्थानावर आहेत.