LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणुक करून दरमहा मिळवा 36000 रुपये

बिझनेसनामा । भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव लाईफ इन्शुरन्स कंपनी असलेल्या LIC च्या 2000 पेक्षा जास्त शाखा आणि 14 लाखांहून जास्त एजंट आहेत. LIC मध्ये कोट्यवधी भारतीयांनी गुंतवणुक केली आहे. गुंतवणूकीची सुरक्षितता आणि त्यावर दिला जाणारा चांगला रिटर्नमुळे कंपनी देशात खूपच लोकप्रिय आहे. देशातील सर्वांत मोठी इन्शुरन्स कंपनी असलेल्या LIC कडून अनेक योजना चालवल्या जातात. मात्र आज आपण एका अशा पॉलिसीबाबत माहिती जाणून घेणार आहोत ज्याद्वारे आपल्याला दरमहा 36000 रुपये कमवता येतील.

एलआयसी कडून आपली LIC जीवन अक्षय पॉलिसी योजना (LIC Jeevan Akshay Policy) पुन्हा एकदा सुरू केली जाते आहे. या पॉलिसी अंतर्गत फक्त एकदाच हप्ता भरून आयुष्यभर पैसे मिळतील. ही एक सिंगल प्रीमियमवाली नॉन लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल एन्युइटी योजना आहे.

गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही

हे लक्षात घ्या कि, ज्यांना कमी पैसे गुंतवायचे आहेत त्यांच्यासाठी वार्षिक 12000 रुपये पेन्शनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. तसेच, जर आपल्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे असतील तर यासाठी इतर पर्यायही निवडता येतील. यामध्ये 1 लाख रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे दरवर्षी 12000 रुपये मिळतील. मात्र सध्या या योजनेमधील गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.

कोणाकोणाला लाभ घेता येईल ???

35 ते 85 वयोगटातील लोकांना ही पॉलिसी घेता येईल.

याशिवाय दिव्यांग व्यक्तीनाही या पॉलिसीचा लाभ घेता येईल.

या पॉलिसीमध्ये 10 प्रकारे पेन्शन मिळवता येईल.

अशा प्रकारे मिळवा दरमहा 36,000 रुपये

या पॉलिसी अंतअंतर्गत दरमहा 36,000 रुपये मिळवण्यासाठी Annuity payable for life at a uniform rate चा पर्याय निवडावा लागेल. यामध्ये दरमहा एकरकमी पेन्शन दिली जाईल. उदाहरणार्थ- जर 45 वर्ष वय असलेल्या एखाद्या व्यक्तीने हा प्लॅन घेतला आणि 70,00,000 रुपयांच्या विमा रकमेचा पर्याय निवडला तर त्याला 71,26,000 रुपये एकरकमी प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतर त्यांना दरमहा 36429 रुपयांची पेन्शन दिली जाईल. इथे हे लक्षात घ्या की, सदर व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही पेन्शन बंद केली जाईल.