बिझनेसनामा । LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. ज्यामुळे देशातील अनेक लोकांनी LIC च्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. LIC कडून ग्राहकांसाठी अनेक पॉलिसी लाँच केल्या गेल्या आहेत. यापैकीच एक योजना म्हणजे LIC ची जीवन आनंद योजना. जर कोणाला कमी प्रीमियममध्ये भविष्यासाठी मोठा फंड जमा करायचा असेल तर जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता येईल.
मिळेल एक लाखाचा सम एश्युअर्ड
हे लक्षात घ्या कि, LIC ची ही पॉलिसी ही टर्म पॉलिसीसारखीच आहे. यामध्ये पॉलिसीच्या कालावधीसाठी प्रीमियम भरता येईल. तसेच या योजनेमध्ये पॉलिसीधारकाला मॅच्युरिटीवर अनेक बेनिफिट देखील मिळतील. या पॉलिसीमध्ये एक लाखाचा सम एश्युअर्ड आहे. तसेच यामध्ये गुंतवणुकीसाठी जास्तीची कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.
रायडर देखील उपलब्ध
हे लक्षात घ्या कि, LIC ची ही पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीला एक्सीडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी रायडर, एक्सीडेंट बेनिफिट रायडर, न्यू टर्म इन्शुरन्स रायडर आणि न्यू क्रिटिकल बेनिफिट रायडर असे एकूण चार रायडर दिले जातील. मात्र ही पॉलिसी घेणाऱ्यांना टॅक्स सूट दिली जाणार नाही.
अशा प्रकारे मिळवा 25 लाख रुपये
LIC च्या या पॉलिसीमध्ये दरमहा 1358 रुपये जमा करून 25 लाख रुपये मिळवता येतील. मात्र यासाठी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी लागेल. तसेच यामध्ये 35 वर्षांसाठी गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर 25 लाख रुपये मिळतील. ही रक्कम मिळवण्यासाठी दररोज 45 रुपयांची बचत करावी लागेल. अशा प्रकारे, यामध्ये दर महा 1358 रुपये तर वार्षिक सुमारे 16,300 रुपये जमा करावे लागतील.
अशा प्रकारे मिळवा बोनस
अशाप्रकारे 35 वर्षांत एकूण 5.70 लाख रुपये जमा होतील. यामध्ये मूळ विम्याची रक्कम पाच लाख रुपये असेल. याशिवाय, 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम बोनस देखील दिला जाईल. यासोबतच जीवन आनंद पॉलिसीमध्ये दोनवेळा बोनस देखील मिळेल. मात्र यासाठी पॉलिसी 15 वर्षांची असावी लागेल.
डेथ बेनिफिट
यामध्ये जर पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाला तर नॉमिनीला पॉलिसीच्या बेनिफिटच्या 125% रक्कम दिली जाईल. त्याच वेळी, जर पॉलिसी धारकाचा पॉलिसीच्या मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला तर नॉमिनीला निश्चित वेळेइतके पैसे मिळतील.