बिझनेसनामा ऑनलाईन । LIC ही सर्वात परिचित अशी विमा कंपनी आहे. वेळोवेळी ती आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. LIC ला विश्वासू विमा कंपनी म्हणून देखील ओळखलं जातं. LIC ची सर्वात परिचित योजना म्हणजे सेवानिवृत्ती योजना होय. सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण एका सुरक्षित पेन्शनच्या शोधात असतो. आयुष्यभर काम केल्यानंतर निदान निवृत्तीनंतर जीवन सुखी व्हावं म्हणून अशा योजना असतात. आज आम्ही तुम्हाला LIC च्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर 50 हजारांची पेन्शन मिळवू शकता. ही योजना नेमकी काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगतो.
LIC नवीन जीवन शांती योजना- LIC New Jeevan Shanti Policy
LIC च्या या योजनेचे नाव LIC नवीन जीवन शांती योजना असं आहे. निवृत्तीनंतरचे आपले जीवन सुखकर होण्यासाठी LIC ने ही नवीन योजना सुरू केली आहे. ही एक सिंगल प्रिमियम योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर दरवर्षी तुम्हाला 50,000 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. गुंतवणूक करताना आपण सुरक्षितता पाहतो. पैसे केवळ अश्याच ठिकाणी गुंतवतो जिथे रक्कम सुरक्षित असण्याची हामी दिली जाते. आतापर्यंत अनेक योजना यशस्वीपणे राबवत LIC ने हा विश्वास मिळवला आहे. त्यामुळे पैसे गुंतवल्यानंतर इथे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
LIC योजनेसाठी या गोष्टी महत्त्वाच्या:
LIC नवीन जीवन शांती योजना मध्ये (LIC New Jeevan Shanti Policy) गुंतवणूक करण्यासाठी 30 ते 79 अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यातून जर का तुमचा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याची सर्व रक्कम ही नॉमिनीला मिळते. योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले जातील. यातील पहिला पर्याय म्हणजे सिंगल जीवनासाठी गुंतवणूक आणि दुसरा पर्याय म्हणजे संयुक्त जीवनासाठी गुंतवणूक ….
न्यू जीवन शांती योजनेत कोणत्याही व्यक्तीने 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्या व्यक्तीला दर महिन्याला 11192 रुपये पेन्शन मिळू शकते.
जर तुम्हाला पैशांची तातडीची गरज असेल तर तुम्ही या पॉलिसी अंतर्गत लाभासाठी कर्जासाठी अर्ज करू शकता. परंतु तुम्ही पॉलिसीची मुदत पूर्ण केल्यानंतरच या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
ही एक वार्षिक योजना आहे, निवृत्तीनंतर निश्चितपणे ही पेन्शन तुम्हाला मिळत राहील. मात्र या पेन्शन मध्ये कोणत्याही प्रकारचे जोखिम कवच दिले जात नाही तरीही योजनेत उपलब्ध असलेल्या सोयींमुळे अधिकाधिक लोकं या योजनेकडे वळत आहेत.