बिझनेसनामा ऑनलाईन । भारताची प्रमुख विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन बिमा निगम (LIC Policy) कडे विविध प्रकारच्या विमा पॉलीसी उपलब्ध आहेत. या पॉलिसी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या योजना ग्राहकांना देत असतात . LIC कंपनी कडे देशातील प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या पॉलीसी उपलब्ध असून यात आणखी भर म्हणजे LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणली आहे. LIC धन वृद्धी असं या सदर योजनेचं नाव असून या योजनेमध्ये 23 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता.
नेमकी काय आहे योजना? (LIC Policy)
LIC धन वृद्धी (LIC Policy) या निश्चित मुदत विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय वय 32 ते 60 वर्षे या दरम्यान असले पाहिजे. LIC या कंपनी नुसार ही पॉलिसी 1,000 रुपयांच्या विमा रकमेवर 75 रुपयांपर्यंत अतिरिक्त हमी देते. LIC ची ही सिंगल-प्रिमियम पॉलिसी आहे. ही पॉलिसी मुदतीदरम्यान बचत आणि संरक्षण यांचे सहमती देते. पॉलिसी सुरु असताना धारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत देण्याची तरतूद योजनेत आहे. त्याचबरोबर मुदतपूर्तीचा कालावधी पूर्ण झाल्यावर हमीभाव देण्याची तरतूदही यामध्ये ठेवण्यात आली आहे.
23 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत करा अर्ज –
23 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्ही या एलआयसी योजनेसाठी अर्ज करू शकतात. यानंतर ही पॉलिसी बंद करण्यात येईल. त्याचबरोबर सुरक्षा विकास आणि आर्थिक स्थिरता यासोबतच सर्वसमावेशक जीवन विमा मिळू शकतो. ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करणे यासोबतच ग्राहकांच्या समस्या सोडवणे या सर्व गोष्टी ही कंपनी करणार आहे.