बिझनेसनामा ऑनलाईन । भविष्यात आर्थिक चिंता सतावू नये म्हणून आपण हातात पैसा कमावण्याचे साधन असताना थोडी रक्कम बाजूला काढून ठेवत असतो, बाजूला ठेवतो म्हणजे काय तर सेव (Saving ) करतो. सरकार किंवा इतर वित्तीय कंपन्यांकडून पैसे योग्यरीत्त्या गुंतवण्याचे वेगवेगळे पर्याय सुचवले जातात. आणि या वित्तीय सेवांमध्ये सर्वात परिचित आहे ती म्हणजे LIC, हि देशातील सर्वात उत्तम विमा कंपनी आहे आणि इथे केलेली पैश्यांची गुंतवणूक हि सर्वात सुरक्षित आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला LICच्या एका विशेष पॉलीसी बद्दल सांगणार आहोत. या पॉलीसीची खासियत म्हणजे इथे कमीत कमी गुंतवणूक करून सुद्धा मोठा परतवा मिळवला जाऊ शकतो. काय आहे हि योजना (LIC Policy)जाणून घेऊया
LIC Policy: युनिट लिंक्ड प्लॅन
LIC च्या या पॉलिसीचे नाव युनिट लिंक्ड प्लॅन असं आहे. LIC कडून राबवली जाणारी हि योजना अनेकांच्या पसंतीत उतरत आहे. हि योजना बचत आणि कवरेज एकत्र देत असल्यामुळे अनेक लोकं याला प्राधान्य देत आहेत. हा प्लॅन Online खरेदी करता येतो. भले तुम्ही दर महिन्याला मोठी रक्कम मिळवू शकत नसाल तरीही इथे गुंतवणूक करू शकता. LIC जवळ प्रीमियम युनिट लिंक्ड प्लॅन मध्ये अनेक योजनांचा समावेश होतो. खात्रीशीर परतावा आणि योग्य गुंतवणूक म्हणून LIC चं नाव का घेतलं जातं ते या योजनेतून दिसून येतं, इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार प्रीमियम विकत घेऊ शकता व तो जमा करण्याचा पर्याय निवडू शकता.
LIC चे युनिट लिंक्ड प्लॅन खालील प्रमाणे आहेत:
LIC’s Nivesh Plus: हा एक प्रकारचा लिंक्ड प्लेन आहे ज्यामध्ये इन्शुरन्स आणि इनवेस्टमेंट एका प्रीमियम पेमेंट साठी देऊ केलं जातं. इथे गुंतवणूक करणाऱ्या माणसाच्या मृत्यनंतर सुद्धा एक ठरलेली रक्कम मागून नॉमिनी म्हणून नाव असलेल्या व्यक्तीला दिली जाते.
LIC’s SIIP हा आणखी एक प्रकारचा लिंक्ड प्लेन आहे, ज्यामध्ये इनशुरन्स आणि इंवेस्टमेंट या दोन्ही गोष्टी एका सिंगल कवर खाली दिल्या जातात. इथे 21 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो आणि मुदत संपल्यानंतर यावर तुम्हाला 3 पट परतवा मिळू शकतो.
या व्यतिरिक्त LIC’s New Pension Plus आणि LIC’s New Endowment Plus असे आणखी दोन पर्याय आहेत जी दीर्घकाळापर्यंत मोठा परतावा देतात.