LIC Q3 Results: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने गुरुवारी 2023 च्या डिसेंबर तिमाहीसाठी निव्वळ नफ्यात 49 टक्क्यांची वाढ दर्शवणारे निकाल जाहीर केले. नफ्यातील वाढीचे मुख्य कारण म्हणजे LIC ने भागधारकांच्या फंडात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक म्हणावे लागेल. कंपनीने 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 9,444 कोटींचा एकल निव्वळ नफा कमावला, तर 2022 च्या त्याच तिमाहीत हा नफा केवळ 6,334 कोटी रुपये होता.
कंपनीने जाहीर केलाय लाभांश: (LIC Q3 Results)
LIC ने या तिमाहीत चांगली कामगिरी करत प्रचंड नफा कमावला आणि याच यशाचा आनंद घेत कंपनीने प्रति शेअर 4 लाभांश जाहीर केला आहे. LIC Non Participated Policy मधून प्रीमियम गोळा करते, ज्यात निश्चित परतावा असतो. या पॉलिसींमधून जमा झालेला पैसा गैर-सहभागी फंडामध्ये जमा केला जातो. यंदाच्या तिमाहीत LIC ने या फंडातून 7,692 कोटी भागधारकांच्या निधीत हस्तांतरित केले आहेत.
LIC च्या शेअर्समध्ये दमदार वाढ:
गुरुवारी LICच्या शेअर्समध्ये 6.5 टक्क्यांची वाढ होऊन ते 1,112 रुपयांवर बंद झाले होते आणि शुक्रवारी सकाळी ते 5.08 टक्क्यांनी वाढून 1,161.35 रुपयांवर व्यवहार करू लागले. गेल्या 5 दिवसांत LICच्या शेअर्सने 17.72 टक्क्यांचा परतावा दिला आहे. एका महिन्यात तर हा परतावा 33.58 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला होता(LIC Q3 Results). तर गेल्या 6 महिन्यांत शेअरच्या किंमतीत 72.68 टक्क्यांची वाढ झाली होती.