LIC Share Price :गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार काहीसा मंद आहे, मात्र तरीही सरकारी विमा कंपनी म्हणजेच LIC ने अश्या परिस्थितीत दमदार कामगिरी बजावून दाखवली आहे. शेअर बाजार कमकुवत असून देखील LIC चे शेअर्स ग्रीन झोनमध्ये(Green Zone) वावरत आहेत, आणि म्हणूनच आता LIC ने स्टेट बँकला मागे टाकत देशातील शेअर बाजारामध्ये सर्वोत्कृष्ट सरकारी कंपनी असल्याचा इनाम मिळवला. LIC कंपनीची ही कामगिरी खरोखर लक्षणीय म्हणावी लागेल. मात्र शेअर बाजार मंदावलेला असताना देखील LIC ने नेमकी कशी बाजी मारली हे जाणून घेऊया..
LIC शेअर्सची दमदार कामगिरी: (LIC Share Price)
सध्या भारताच्या शेअर बाजाराची स्थिती जराशी मंद गतीत पुढे सरकत आहे, मात्र अश्यावेळीही LIC कंपनीच्या शेअर्सनी केवळ मंगळवारीच नाही तर बुधवारी देखील सफल घोडदौड कायम ठेवली. बुधवारी कंपनीचे शेअर्स 2 टाक्यांनी वाढून 900 रुपयांवर जाऊन पोहोचले होते, याला 52 आठवड्यांतील उचांक म्हणावा लागेल. कंपनीच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे कंपनीचे मार्केट कॅप (Market Cap) देखील वाढले आणि 5.8 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊन पोहोचले. कंपनीने केलेल्या याच लक्षणीय कामगिरीमुळे सध्या ती शेअर बाजारातील सर्वोत्तम सरकारी कंपनी बनली आहे.
बुधवारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स रेड झोनमध्ये (Red Zone) व्यवहार करीत होते. कंपनीच्या शेअर्समध्ये 1.18 टक्क्यांची घट झाल्याने त्यांनी 626.90 रुपयांनी व्यवहार करायला सुरुवात केली. परिणामी कंपनीचे मार्केट कॅप देखील कमी होऊन 5.61 लाख कोटी रुपयांवर येऊन पोहोचले होते. म्हणूनच स्टेट बँकला मागे टाकून LIC शेअर बाजाराच्या शर्यतीत पुढे निघून गेली आहे (LIC Share Price), त्यांचे मार्केट कॅप वाढले आणि अनेक दिवसांनंतर कंपनीने गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी दिली, सध्या कंपनीचे शेअर्स IPO प्राईस पासून केवळ 4 टक्के दूर आहेत.