LIC Shares: आज बाजारात घसरण होत असतानाही LICच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. सकाळी 11.20 वाजता ते 9.13 टक्क्यांच्या तेजीने 1144.45 रुपयांपर्यंत पोहोचले, आणि हा आकडा त्याचा सर्वकालीन उच्चांक आहे. यासह कंपनीचे मार्केट कॅप 7,21,302.74 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आणि म्हणूनच आता ही कंपनी देशातील चौथी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. कंपनीचे मार्केट कॅप ICICI Bank आणि Infosys पेक्षाही पुढे गेले आणि आता LICच्या पुढे फक्त तीन कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज, TCS आणि HDFC Bank बाकी राहिल्या आहेत.
LIC साठी आज कसा होता बाजारी दिवस?
मागील सत्रात LIC चा शेअर 1045.00 रुपयांवर बंद झाला होता आणि आज तो 1074.95 रुपयांवर उघडला. कंपनी आज तिमाही निकाल जाहीर करणार असल्याची बातमी असून यामध्ये कंपनीच्या नफ्यात 12.2 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, “मी सीना तानके कहना चाहता हूं, आंखें ऊंची करके सुनाना चाहता हूं, आज LIC का शेयर रेकॉर्ड स्तर पर है.”
आपल्याकडे वर्ष 2014 मध्ये देशात 234 सरकारी कंपन्या होत्या, तर आज त्यांची संख्या वाढून 254 झाली आहे. याच सर्व कंपन्यांवर विश्वास दाखवत त्यांनी पुढे असेही म्हटले की सरकारी कंपन्यांच्या शेअरवर लोकांचा विश्वास वाढत आहे(LIC Shares). पंतप्रधानांनी हे विधान LICच्या बोर्डाच्या बैठकीच्या वेळी केले. या बैठकीत डिसेंबर तिमाहीच्या निकालांना मान्यता दिली जाईल आणि हा बोर्ड आर्थिक वर्ष 2023-24 साठी अंतरिम लाभांशाच्या प्रस्तावावरही विचार करेल.
मोदींचा सरकारी कंपन्यांवर ठाम विश्वास: (LIC Shares)
मोदी यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विरोधी पक्षांनी संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना गुंतवणूकदारांना सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या भाषणानंतर किमान 22 सरकारी कंपन्यांनी मल्टीबॅगर रिटर्न दिले. याचा अर्थ गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सच्या किंमतीत 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या काळात 56 शेअर्स असलेला BSE PSU इंडेक्स 66 टक्क्यांच्या वाढीसह 59.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच या काळात गुंतवणूकदारांना 23.7 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.