Lijjat Papad Success Story : पापड विकून गृहिणीने उभा केला 1,600 कोटींचा व्यवसाय, फक्त 80 रुपयांपासून केली होती सुरवात; 42,000 लोकांना दिली नोकरी…

Lijjat Papad Success Story : टीव्ही सुरु झाला कि लिज्जत पापडची जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असेल. पण तुम्हाला माहिती आहे १ हजार ६०० कोटी इतका टर्नओव्हर असणाऱ्या लिज्जत पापडची सुरुवात कोणी केली? हा व्यवसाय एवढा प्रसिद्ध कसा झाला? फक्त पापड विकून ४२,००० जणांना नोकरी देऊन व्यवसाय उभी करणारी व्यक्ती कोण अन त्यांनी हा व्यवसाय कसा सुरु केला याचीच गोष्ट आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

लिज्जत पापड व्यवसायाची सुरवात साधारणपणे 1959 मध्ये झाली. म्हणजेच भारत स्वतंत्र होऊन काही वर्षानंतरचा हा काळ होता. चूल आणि मुल याबाहेर जेव्हा महिलांना जगच माहिती नव्हतं तेव्हा जस्वन्तिबेन जमनादास पोपट (JASWANTIBEN JAMNADAS POPAT) या एका गृहिनेने या व्यवसायाची सुरुवात केली. नुकतेच वयाच्या ९३ व्या वर्षी जसवंतीबेन यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. त्यांना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला होता.

जस्वन्तिबेन पोपट कोण होत्या? (Lijjat Papad Owner)

गिरगावातील चिरबाजार परिसरात लोहाणी निवास या परिसरात राहणाऱ्या एक सर्वसामान्य गृहिणी म्हणजे जस्वन्तिबेन पोपट. त्या एका पारंपारिक घरात राहत असत. आपल्या जीवनाबद्दल बोलताना एकदा त्यांनी उल्लेख केला होता कि वर्ष 1959 मध्ये त्यांचं वय केवळ 27 ते 28 वर्षाचं होतं. घरातील पुरुष मंडळी कामासाठी बाहेर पडायची आणि लहान मुलंसुद्धा शाळेसाठी निघायची. मग काय जस्वन्तिबेन सारख्या काही अशिक्षित महिला घरात मागे राहायच्या. (lijjat papad franchise)

लिज्जत पापडांची सुरुवात याच घरातील अशिक्षित गृहिणींनी केली. गुजराती घरांमध्ये दररोज लागणारी गोष्ट म्हणजे पापड. बोलता बोलता पापडांचा व्यवसाय सुरु करावा का अशी कल्पना डोक्यात आली. पण हातात पैसे नव्हते ना पदरात शिक्षण, केवळ सोबत होती ती कलेची. आणि इथूनच सुरु झाला लिज्जत पापडांचा प्रवास (Lijjat Papad History)

80 रुपयांच्या उधरीपासून सुरु झाला व्यवसाय :

व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा हातात पैसे नसल्यामुळे जस्वन्तिबेन आणि त्यांच्या 6 मैत्रिणी यांनी मिळून सर्व्हान्ट ऑफ इंडियाच्या चागांलाल पारेख यांची भेट घेतली. महिलांकडून सुरु केलेल्या या व्यवसायामुळे पारेख खुश झाले व त्यांनी या महिलांना 80 रुपये उधार म्हणून दिले. यानंतर मासले वगरे समान घेऊन इमारतीच्या गच्चीत लिज्जत पापड लाटायची सुरुवात झाली.

महिलांना इज्जत देणारा लिज्जत (Lijjat Papad Story)

या छोट्या व्यवसायाला वर्ष 1962 मध्ये महिला गृह उद्योग लिज्जत पापड असं नाव देण्यात आलं. हे नाव काम करणाऱ्या महिलांनीच ठरवलेलं आहे. गुजराती भाषेत लिज्जतचा अर्थ चविष्ट असा होतो. त्यामुळे ‘लिज्जत की ही इज्जत बढेगी’ या संकल्पनेखाली कामाची सुरुवात झाली व आज लिज्जत पापड यांचा चालेला व्यवसाय पाहता त्या महिलांचा विश्वास सार्थ वाटतो. (Success Story).

तरुण मुलींपासून ते वायोवृधांपर्यंत सर्वांना काम मिळालं ते या व्यवसायामुळे. पहिल्या वर्षात व्यवसायाला 6,196 रुपयांचा फायदा झाला. हळूहळू सदस्यांची संख्या वाढत गेली आणि वर्ष 1966 मध्ये हा व्यवसाय नोंदणीकृत करण्यात आला. वाढत्या व्यवसायाबरोबर केंद्र वाढत गेली आणि आज 45 ते 50 महिला या व्यवसायाच्या भाग आहेत.

महिलांना एकत्र आणून व्यवसाय सुरु करणाऱ्या जस्वन्तिबेन पोपट यांचे सोमवारी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी निधन झाले. यावेळी त्यांचे वाय 93 वर्ष असं होतं. आता त्यांच्या कार्याची दाखल घेत त्याचं एक स्मारक उभं राहावं जेणेकरून इतरांना त्याच्या आठवणींतून नेहमीच प्रेरणा मिळेल.

लिज्जत पापड किती रुपयाना मिळतो? (Lijjat Papad Rate)

पापड हा रोजच्या आहारात लागणार पदार्थ आहे. तसेच सध्या हॉटेल, खानावळ अन शहरातील घरे इथे लोक पापड घरच्या घरी न बनवता थेट ऑर्डर करत असल्याने लिज्जत पापडाची मागणी मोठी आहे. लिज्जत पापडणेही पूर्वीपासून योग्य किंमत ठेवल्याने हा ब्रँड प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असा आहे. लिज्जतचे वजनानुसार वेगवेगळे पॅकेट्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (Lijjat Papad 500 gm Price, Lijjat Papad 200 gm Price) लिज्जत पापड ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन Lijjat Masala Papad, Lijjat Udad Papad, Lijjat Moong Papad असे अनेक प्रकारचे पापड बनवत आहे.