Linkedin Layoffs : आता बाकी कंपन्यांनंतर ‘ही’ कंपनी सुद्धा हटवणार कर्मचारी

Linkedin Layoffs : जगभरात अनेक ठिकाणी सध्या कर्मचारी वर्गाची कपात सुरु आहे. तर अनेक IT कंपन्या नवीन लोकांना संधी उपलब्ध करवून देऊ इच्छित नाहीत. यात आता अजून एका टेक कंपनीचा समावेश झाला आहे ती म्हणजे LinkedIn.. LinkedIn या सोशल मिडिया प्रकाराबद्दल तुम्हाला माहित असेलच. इथे भलामोठा कर्मचारी वर्ग आपल्या कामाची, मिळवलेल्या यशाची माहिती देतो. कितेक्यादा कंपन्या LinkedIn वरून नवीन कर्मचारी वर्ग सुद्धा निवडतात. मात्र अश्या या चर्चित प्लेटफॉर्मने आपल्या कर्मचारी वर्गाला कामावरून बेदखल केले आहे…

LinkedInने हटवले कर्मचारी : Linkedin Layoffs

मायक्रोसोफ्टची मालकी असलेल्या LinkedIn ही सोशल मिडिया साईट आपल्या अनेक कर्मचारी वर्गाला कामावरून काढणार अशी बातमी समोर आली आहे. यावर्षात सलग दुसऱ्यावेळी कंपनी आपल्या कर्मचारी विभागाला धक्का देणार आहे. कंपनीत एकूण 20,000 लोकं काम करतात आणि आता LinkedIn चे अधिकारी म्हणाले आहेत कि ते यांपैकी एकूण 668 कर्माचारयांना कमी करणार आहे. हे कर्मचारी इंजिनिअरिंग, टोलेंट आणि फायनांस विभागातून आहेत. यावर्षीच मे महिन्यात 716 लोकांना कामावरून काढल्यानंतर अजून काही आकडा कमी करण्याची (Linkedin Layoffs) हि कंपनीची दुसरी वेळ आहे.

कंपनी का हटवत आहे कर्मचारी?

पाहायला गेलं तर हे पूर्ण वर्ष टेक कंपन्यांसाठी काही खास प्रगती करणारं नाही. अनेक कंपन्यांनी या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना हटवलं आहे. एक इम्प्लोय्मेंट फर्म सांगते कि या वर्षी टेक कंपन्यांमधून 1,41,516 लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. LinkedIn हि कंपनी जाहिरातींचा वापर करून पैसे मिळवते, आता कंपनीच्या जाहिरातींच्या खर्चात घट झाल्याने त्याचा फटका कंपनीला बसला. अमेरिका आणि युरोपमध्ये सुरु असलेल्या मंदीच्या भीतीमुळेही हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. मात्र यंदा LinkedIn च्या वापरकर्त्यांमध्ये वाढ झालेली असून नवीन वापरकर्त्याचा आकडा 95 कोटींवर पोहोचला आहे.