Loan Repayment Rules : जगात तसेच देशात महागाईचा स्तर दिवसेंदिवस वाढत चालेला आहे. अश्या महागाई सोबत दोन हात करायचे असतील तर खिश्यात पैसे असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यात जर का तुमच्यावर परिवाराची जबाबदारी असेल तर काम करण्याशिवाय तुमच्यासमोर आणखीन पर्याय उपलब्ध नसतो. अनेकवेळा पैश्यांच्या कमतरतेमुळे आपण कर्ज काढतो. बँक किंवा अनेक आर्थिक संस्था अश्यावेळी तुम्हाला कर्ज देऊ करतात. या कर्जांमध्ये होम लोन, कार लोन आणि इतर वैयक्तिक कर्जांचा समावेश होतो. अलीकडच्या काळात अनेक बँका व्याजदरात काही अंशी चांगली सवलत देत असल्यामुळे कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण कर्ज घेणाऱ्या माणसाचे अचानक निधन झाले तर या रकमेची परतफेड कोणी करावी असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. त्यामुळे आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया…
कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर?
अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये तुम्ही पाहिलं असेलच कि कर्ज घेणाऱ्या माणसाचा अकस्मात मृत्यू झाला तर अधिकारी घरावर जप्ती आणतात, किंवा घरच्या इतर मंडळींवर अत्याचार करतात. पण या झाल्या सिनेमातल्या गोष्टी ज्या अधिक वेळा काल्पनिक असतात. पण कधी अश्या परिस्थतीत खरोखर काय केलं जातं याचा विचार केला आहे का? नसेल तर आज जाणून घेऊया कि जर का एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतले असेल आणि अकस्मात त्याचा मृत्यू झाला तर सदर रकमेची परतफेड (Loan Repayment Rules) करण्यासाठी नेमकं जबाबदार कोणाला धरलं जातं. सर्वात आधी जाणून घ्या कि देशातील सर्वोच्य बँकेने प्रत्येक परिस्थतीसाठी काही नियम बनवले आहेत, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.
नियम काय सांगतो? (Loan Repayment Rules)
रिझर्व बँकच्या नियमानुसार विशिष्ठ कालावधीत कर्जाच्या रकमेची परतफेड होणं अनिवार्य आहे, पण जर का कर्ज घेणारा माणूसच हयात नसेल तर अश्यावेळी काय करता येईल यावरही रिझर्व बँकचे नियम तयार आहेत. सर्वात आधी कर्जाची परतफेड कोण करणार हे कर्जाच्या प्रकारावर आणि कपातींवर अवलंबून असते. गृहकर्जाची रक्कम मृत व्यक्तीच्या वारसदाराने परत करणे अनिवार्य आहे, जर का तो असे करण्यात असमर्थ ठरला तर बँक त्या मालमत्तेचा ताबा मिळवू शकते आणि सदर मालमत्तेचा लिलाव करून कर्जाची रक्कम वसूल केली जाते. मात्र कर्जाचा विमा उतरवला असेल तर विमा कंपनीच कर्जाची रक्कम वसूल करते.
इतर कर्ज जसे कि कार लोन, पर्सनल लोन आणि क्रेडीट कार्ड यांच्या बाबतीत बँका घरच्या सदस्यांशी संपर्क करतात. कार लोनच्या बापतीत मृत व्यक्तीचा वारस कर्जाची रक्कम परत करून ते वाहन स्वतः साठी मागे ठेऊ शकतो पण असे न झाल्यास बँक वाहन जप्त करून पैश्यांची वसुली करेल (Loan Repayment Rules). क्रेडीट कार्ड आणि पर्सनल लोनच्या बाबतीत काहीही तारण ठेवले जात नाही त्यामुळे बँका कोणाला थकबाकीसाठी जबाबदार धरू शकत नाहीत, मात्र तुम्ही या रकमेची परतफेड करू शकता कारण पैसे परत न मिळाल्यास बँकेला ते लोन NPA म्हणजेच Non-Profit Asset म्हणून घोषित करण्याचे अधिकार दिले गेले आहेत.