Lok Sabha 2024: गुगल जाहिरातींचा खर्च 100 कोटींच्या पार; कोणते राज्य आघाडीवर?

Lok Sabha 2024: देशभरात जर का आत्ताच्या घडीला सर्वाधिक चर्चा जर का कश्याची असेल तर ती म्हणजे येणाऱ्या निवडणुकांची. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार सात टप्प्यांमध्ये हे मतदान घेतलं जाणार आहे, पैकी सातवा टप्पा 1 जून असा ठरवण्यात आला आहे. त्यानंतर 4 जून रोजी येणाऱ्या निकालामध्ये भाजप आपली सत्ता कायम धरून ठेवेल की विरोधी पक्षांना स्वतःला सिद्ध करायची संधी मिळेल याचे उत्तर मिळेल.

निवडणुकांमुळे वाढलाय जाहिरातींचा खर्च? (Lok Sabha 2024)

निवडणूक तोंडावर असताना प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाची बाजू मतदारांच्या समोर ठेवण्याच्या प्रयत्नात आहे, आणि आज आपण याच विविध पक्ष्यांच्या जाहिरातींवरचा खर्च उलघडून पाहणार आहोत. गेल्या तीन महिन्यांमध्ये गुगलच्या माध्यमातून केलेला खर्च हा 100 कोटींच्याही वर गेलेला असल्याच्या चर्चा सुरु आहेत. गुगलवर जाहिरातींसाठी Search, Display, YouTube आणि Gmail यांसारख्या सुविधांचा वापर केला जातो.

आता जर का गुगलचा डेटा तपासून पाहायचा झाला तर उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक जाहिराती देण्यात आल्या आहेत आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रासोबतच ओडिशा, तामिळनाडू आणि गुजरातचा क्रमांक लागतो(Lok Sabha 2024). सर्व राज्यांच्या तुलनेत या पाच राज्यांनी 40 टक्के खर्च केला आहे. पक्ष्यांमध्ये झाकून पाहायचं झाल्यास भाजपचा जाहिरात खर्च सर्वात अधिक आहे. भाजपने गुगल जाहिरातींवर 30.9 कोटी रुपये खर्च केले असून काँग्रेसचा आकडा 18.8 लाख रुपये आहे. आजकाल तंत्रज्ञाचा वापर वाढत असल्याने मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अशाप्रकारच्या जाहिराती सर्वाधिक सोयीस्कर मानल्या जातात.