Lok Sabha Elections: निवडणुकांमुळे 20 मे रोजी शेअर बाजार बंद राहण्याची शक्यता

Lok Sabha Elections: सध्या देशात सर्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे येणाऱ्या निवडणुकांची आणि या निवडणुकांचा परिणाम देशातील प्रत्येक क्षेत्रावर होणार आहे आणि शेअर बाजार याला अपवाद नाही. अजूनही माध्यमांना पूर्णपणे अधिकृत माहिती मिळालेली नसली तरीही येणाऱ्या निवडणुकांमुळे मे महिन्याच्या 20 तारखेला बाजार बंद असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत, मात्र अश्या कुठल्याही बातमीवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत माहिती मिळवणं कधीही भल्याचं ठरतं.

निवडणुकांमुळे बाजार बंद? (Lok Sabha Elections)

येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे 20 मे रोजी मुंबई शेअर बाजार बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी म्हणजेच वर्ष 2014 आणि 2019 मध्ये निवडणुकांमुळे शेअर बाजार बंद ठेवण्यात आला होता आणि म्हणूनच यावेळी पुन्हा अशी वेळ येईल का याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. मात्र लक्षात ठेवा ही फक्त शक्यता आहे, कारण अंतिम निर्णय बाजार नियंत्रकांवर अवलंबून असतो.

मुंबई शहरात ही निवडणूक पाच भागांमध्ये घेतली जाणार आहे(Lok Sabha Elections), आणि पुढे जात याची मतमोजणी 4 जून 2024 रोजी केली जाईल. यापूर्वी मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यांनी 2014 आणि 2019 या वर्षांमध्ये मतदानासाठी बाजाराला विशेष सुट्टी दिली होती, आणि त्याच दिवशी विदेशी चलन आणि रोखे बाजारही बंद होते.